फेसबुकनं नवीन आणलेलं Metaverse नेमकं आहे तरी काय? | पुढारी

फेसबुकनं नवीन आणलेलं Metaverse नेमकं आहे तरी काय?

पुढारी ऑनलाईन डेस्क

मार्क झुकेरबर्गने फेसबुकचे नाव बदलल्याची घोषणा केली. फेसबुकचे आता नवे नाव META हे असणार आहे. ज्यासाठी फेसबुकने नाव बदलले आहे. हे मेटाव्हर्स नावाने ओळखले जाणार आहे. Metaverse एक वेगळेच जग आहे. जे पूर्ण इंटरनेटवर आधारीत आहे. फेसबुक देखील मेटाव्हर्समध्ये सतत गुंतवणूक करत आहे. फेसबुक व्यतिरिक्त, इतर अनेक कंपन्या देखील मेटाव्हर्स बनण्याच्या विचारात आहेत.

मार्क झुकेरबर्ग कंपनीच्या नव्या नावाच्या घोषणेवेळी म्हणाले की, “सामाजिक समस्यांशी लढताना आणि अगदी जवळच्या प्लॅटफॉर्मवर एकत्र असताना आम्ही खूप काही शिकलो आणि आता आम्ही जे शिकलो ते अनुभवून एक नवीन अध्याय सुरू करण्याची वेळ आली आहे. आजपासून आमची कंपनी आता META आहे हे जाहीर करताना मला अभिमान वाटतो. ते आमचे ध्येय आहे. आमची अॅप्स आणि ब्रँडची नावे बदलत नाहीत. आज आपल्याला सोशल मीडिया कंपनी म्हणून ओळखले जाते, पण डीएनएनूसार आम्ही लोकांना जोडणारी तंत्रज्ञान विकसित करणारी कंपनी आहोत.”

Metaverse

काय बदलले आणि काय नाही?

फेसबुकचे नाव बदलल्याची घोषणा झाल्यानंतर अनेकांना प्रश्न पडला आहे नेमक काय बदललं आहे. केपनीचे फक्त ब्रॅन्डींग बदललं आहे. म्हणजेच फेसबुक कंपनीला आता META या नावाने ओळखले जाणार आहे. फेसबुकवर नव्हे तर कंपनीच्या मुख्यालयावर मेटा लिहिले जाईल. फेसबुक अॅपचे नाव बदलले जाणार नाही. आणि इंन्स्टाग्राम, व्हॉटस् अॅपचे नाव बदलले जाणार नाही. तसेच कंपनीच्या विविध पदांमध्ये कोणताही बदल होणार नसून १ डिसेंबरपासून कंपनीच्या स्टॉकवर MVRS नावाचे स्टिकर असेल. कंपनीच्या मुख्यालयातील थंब (लाइक) लोगो आता काढून टाकण्यात आला आहे आणि त्याच्या जागी नवीन लोगो देण्यात आला आहे जो इन्फिनिटी सारखा आहे.
मार्क झुकेरबर्गच्या नजरेतून मेटा काय आहे?

  • मार्क झुकरबर्गने Metaverse ला आभासी जग म्हटले आहे. झुकरबर्कच्या मते, तुम्ही फक्त स्क्रीन बघून वेगळ्या जगात जाऊ शकता जिथे तुम्ही व्हर्च्युअल रिअॅलिटी हेडसेट, ऑगमेंट रिअॅलिटी गॉगल, स्मार्टफोन अॅप्स इत्यादीद्वारे लोकांशी कनेक्ट होऊ शकता, गेम खेळू शकता, खरेदी करू शकता आणि सोशल मीडियाचा वापर करू शकता. Metaverse मध्ये, तुम्ही साधारणपणे कराल ते सर्व काही करू शकाल. मेटाव्हर्स टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून लाखो लोकांना नोकऱ्या मिळणार असल्याचे झुकेरबर्गने म्हटले आहे.

मेटाव्हर्स (Metaverse) काय आहे?

Metaverse हा शब्द आज अचानक चर्चेत आला आहे. पण तो खूप जुना शब्द आहे. नील स्टीफनसन यांनी १९९२ मध्ये त्यांच्या डिस्टोपियन कादंबरी “स्नो क्रॅश” मध्ये याचा उल्लेख केला होता. स्टीफन्सनच्या कादंबरीमध्ये, मेटाव्हर्सचा अर्थ असा होता की, ज्यामध्ये लोक हेडफोन्स आणि आभासी वास्तव यासारख्या गॅझेट्सच्या मदतीने गेममधील डिजिटल जगाशी जोडलेले असतात. मेटाव्हर्स आधीच गेमिंगसाठी वापरला जात आहे. मेटाव्हर्समध्ये क्रिप्टोकरन्सी वापरल्या जातात. सोप्या भाषेत सांगायचे तर, मेटाव्हर्स हे इंटरनेटचे एक नवीन जग आहे जिथे लोक उपस्थित नसले तरीही ते उपस्थित असतील, जरी मेटाव्हर्स पूर्ण होण्यास बराच वेळ लागेल.

हेही वाचलत का?

 

 

Back to top button