नैसर्गिक आपत्तीच्या प्रश्नावर गीते यांनी हसणं हे दुर्दैवी : अदिती तटकरे | पुढारी

नैसर्गिक आपत्तीच्या प्रश्नावर गीते यांनी हसणं हे दुर्दैवी : अदिती तटकरे

दापोली; पुढारी वृतसेवा : शेतकरी तुम्हाला विचारत आहेत, की नैसर्गिक आपत्ती वेळी आपण कुठं होतात? या पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर गीते यांनी हसणं हे दुर्दैवी अशा शब्दांत ना.मंत्री अदिती तटकरे यांनी आघाडीचे उमेदवार अनंत गीते यांचा समाचार घेतला.तटकरे या (दि 17)  दापोलीत आल्या होत्या या वेळी त्यांनी बोलताना सांगितले. ज्या जनतेने आपल्याला निवडून दिले त्या जनतेच्या दुःखाच्या प्रसंगी एका लोकप्रतिनिधीने जाण तितकंच महत्वाचं आहे.आणि ती जाणीव असली पाहिजे. गीते हे दोन वेळा केबिनेट मंत्री होते, पाच वेळा खासदार होते मात्र इतक्या वर्षात विकास झाला नाही.तर कायम मतदारसंघाकडे पाठ फिरवली त्यामुळे या सगळ्याचा कुठे ना कुठेतरी विचार करून आपल्याला सुनील तटकरे यांनाच बहुमताने निवडून लोकसभेत पुन्हा पाठवायचं आहे.

मागील निवडणुकीत श्रीवर्धनने लीड दिले होते. तर या वेळेस पेण, महाड, दापोली या विधानसभा मतदार संघातून युतीतील सर्व घटक पक्षातील नेतेमंडळींनी दाखवलेला विश्वास तटकरे यांना बहुमताने विजयी करेल. असा विश्वास देखील या वेळी तटकरे यांनी व्यक्त केला. शहरात,आणि ग्रामीण भागात सगळ्यांनी ताकद लावून सुनील तटकरे निवडून आणायचं आहे.सुनील तटकरे हे निवडून आल्यानंतर दापोलीत महायुतीचे संपर्क कार्यालय असेल आणि त्या ठिकाणी लोकांच्या अडचणी सोडविल्या जातील असे देखील त्यांनी सांगितले.

Back to top button