कोल्हापूर : देशाची खरी प्रगती काँग्रेसच्या काळातच : पी. एन. पाटील | पुढारी

कोल्हापूर : देशाची खरी प्रगती काँग्रेसच्या काळातच : पी. एन. पाटील

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : राजर्षी छत्रपती शाहूरायांच्या पुरोगामी विचाराने देशाची प्रगती करण्याचे काम काँग्रेस पक्षाने केले असून, काँग्रेसच्या काळातच देशाचा खराखुरा विकास झाला आहे. लोकशाही आणि संविधान धोक्यात आल्यामुळे ते वाचवण्यासाठी काँग्रेसच्या पाठीशी राहावे, असे आवाहन आमदार पी. एन. पाटील-सडोलीकर यांनी केले. हसूर दुमाला येथे शाहू महाराज यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या सभेत आ. पाटील बोलत होते. सभेच्या अध्यक्षस्थानी एकनाथ पाटील-बुवा होते.

महात्मा गांधी, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांनी देशासाठी बलिदान दिले आहे; मात्र देशाचा इतिहास बदलून काँग्रेसबद्दल अपप्रचार केला जात आहे. त्याच्या विरोधात तसेच पुरोगामी महाराष्ट्रात प्रतिगामी शक्तींना रोखण्यााठी काँग्रेसच्या पाठीशी राहावे, असेही आ. पाटील म्हणाले.

‘भोगावती’चे संचालक प्रा. सुनील खराडे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. यावेळी बी. एस. पाटील, तुकाराम खराडे यांचीही भाषणे झाली .
दौर्‍यात भारत पाटील-भुयेकर, बाळासाहेब खाडे, प्रा . शिवाजीराव पाटील, सरदार पाटील, मारुतराव जाधव, रघुनाथ जाधव, केरबा भाऊ पाटील सहभागी झाले होते.

निवडणुकीनंतर मंडलिक माजी होतील : संजय पवार

व्यक्तिगत स्वार्थासाठी पक्ष व जनतेची फसवणूक करणार्‍या प्रा. संजय मंडलिक यांना जनता माफ करणार नाही. आगामी लोकसभा निवडणुकीनंतर ते माजी खासदार होतील, अशी टीका शिवसेनेचे उपनेते संजय पवार यांनी केली. शाहू महाराज यांच्या प्रचारार्थ निगवे खालसा येथे ते बोलत होते.

शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख विजय देवणे म्हणाले, यंदाच्या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांना पराभूत करायचे हे जनतेने ठरवले आहे.

आ. ऋतुराज पाटील म्हणाले, महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू महाराज यांना साथ देऊन दिल्लीत पाठवूया. यावेळी बिद्री कारखान्याचे संचालक आर. एस. कांबळे, शेतकरी कामगार पक्षाचे पोपट ढवण, शेतकरी संघटनेचे सदाशिव चौगुले यांची भाषणे झाली.

सत्तेसाठी पक्ष बदलणार्‍या खासदारांना जागा दाखवा : कोरी

सत्तेसाठी पक्ष बदलणार्‍यांना जागा दाखवा, असे आवाहन गडहिंग्लजच्या माजी नगराध्यक्ष स्वाती कोरे यांनी केले. शाहू महाराज यांच्या प्रचारार्थ तुडये (ता. चंदगड) येथे सभेत त्या बोलत होत्या.

गोपाळराव पाटील, विजय देवणे, सुनील शिंत्रे, रजत हुलजी, जगन्नाथ हुलजी, हणमंत पाटील, बसवंत अडकूरकर यांची भाषणे झाली. ए. के. पाटील यांनी आभार मानले.

Back to top button