कोल्हापूर: कागल तहसील कार्यालयातील महिला कारकून ३० हजारांची लाच घेताना ‘लाचलुचपत’च्या जाळ्यात

File Photo
File Photo
Published on
Updated on

कागल: पुढारी वृत्तसेवा: कागल तहसीलदार कार्यालयातील महसूल अव्वल कारकून अश्विनी कारंडे यांना ३० हजारांची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी कार्यालयातच रंगेहात पकडले. त्यामुळे तहसीलदार कार्यालयात खळबळ उडाली आहे. आज (दि.२१) दुपारी ४. १५ च्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.

याबाबत अधिक माहिती अशी की, आज दुपारी ४.१५ च्या दरम्यान कार्यालयात कारंडे या कार्यालयात लाच स्वीकारत होत्या. यावेळी महसूल शाखेमध्ये बहुतांशी सर्व महिला अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. कारंडे लाच घेताना पकडल्याचे समजताच महिला कर्मचारी टेबल सोडून बाहेर गेल्या. कार्यालयातील कॅन्टीनमध्ये जाऊन बसल्या होत्या. तर काहींना धक्का सहन न झाल्याने दुपारनंतर घर गाठले. मागील काही दिवसांपासून कार्यालयातील सावळ्या गोंधळामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता. यापूर्वी देखील तहसीलदारसह तलाठी पंटर यांना देखील लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले होते.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news