नांदेड गांव येथील हॉटेलमध्ये आग | पुढारी

नांदेड गांव येथील हॉटेलमध्ये आग

पुणे : पुढारी वृत्तसेवा : नांदेड गांव येथील भावेश हॉटेलला रविववारी मध्यरात्री लागलेल्या आगीत हॉटेल पुर्णतः जळून खाक झाले. पीएमआरडीए आणि पुणे महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या गाडीच्या मदतीने ही आग अडीच तासात आटोक्यात आणल्याची आल्याची माहिती पीएमआरडीएचे अधिकारी सुजित पाटील यांनी दिली.

dr raman gangakhedkar : ‘ओमिक्रॉन’चा भारतात धोका कमी; पण..!

नांदेड गांव येथील निर्मला हाईट्स येथे पहिल्या मजल्यावर भावेश नावाचे हॉटेल आहे. या हॉटेलमध्ये प्लायवूडचे फर्निचर आहे. सोमवारी मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास हॉटेलला आग लागल्याचा फोन पीएमआरडीएच्या अग्निशमन दलाला मिळाला. हॉटेलमध्ये प्लायवूड असल्याने आगिचा भडका मोठा होता. पीएमआरडीच्या तीन अग्निशमन गाड्या आणि एक महालिकेची अग्निशमन गाडीच्या मदतीने पाण्याचा मारा करून अर्ध्या तासात आग अटोक्यात आणण्यात आली.

काय भुललासी वरलीया रंगा!

आग शांत झाल्यनंतर धुराचे लोट मात्र सुरूच होते. सातत्याने पाण्याचा मारा केल्यानंतर अडीच तासात आग पुर्णपणे आटोक्यात आली. 15 जवानांच्या मदतीने ही कामगिरी पार पाडण्यात आल्याचे सुजित पाटील यांनी सांगितले. यावेळी हॉटेलच्या आतमध्ये कोणीही नसल्याने जीवित हानी टळली. ही आग शॉर्ट सर्कीटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज अग्निशमन अधिकार्‍यांनी वर्तवीला आहे.

राता लंबिया : टांझानियातील भाऊ-बहिणीच्या व्हिडिओने धुमाकूळ (video)

Back to top button