“संपूर्ण जग असे का होऊ शकत नाही?” : आनंद महिंद्रा चिमुरडीच्‍या ‘त्‍या’ व्‍हिडिओने भारावले | पुढारी

"संपूर्ण जग असे का होऊ शकत नाही?" : आनंद महिंद्रा चिमुरडीच्‍या 'त्‍या' व्‍हिडिओने भारावले

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : देशातील ख्‍यातनाम उद्योगपती, ‘महिंद्रा ॲण्‍ड महिंद्रा’चे सर्वेसर्वा आनंद महिंद्रा (Anand mahindra) हे सोशल मीडियावर नेहमीच ॲटिव्‍ह असतात. विविध क्षेत्रात सर्वसामान्‍यांनी केलेली उत्‍कृष्‍ट कामगिरी, हटके संशोधन आणि प्रेरणादायी व्‍हिडीओ ते ट्‍विटरवर शेअर करत असतात. नुकताच त्‍यांनी सोशल मीडियावर प्लॅटफॉर्म एक्स X (पूर्वीचे ट्विटर) वर रस्‍ता ओलांडणार्‍या चिमुरडीचा व्‍हिडिओ शेअर करत, “संपूर्ण जग असे का होऊ शकत नाही?…” असे सवाल केला आहे.

उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी शेअर केलेल्‍या व्हिडिओमध्‍ये एक चिमुरडी एका व्हीलचेअरवर बसलेल्‍या माणसाला ढकलत गजबजलेला रस्‍ता ओलांडताना दिसत आहे. प्रत्येक तीन पावलांनी, ती खाली वाकते आणि ट्रॅफिक सिग्नलवर थांबल्याबद्दल वाहनचालकांप्रती कृतज्ञता व्‍यक्‍त करताना दिसते. आपल्‍या कृतीतून ती थांबलेल्‍या कार चालकांचे आभार मानते.

चिमुरडीच्‍या या व्‍हिडिओने आनंद महिंद्रा प्रभावित झाले आहेत. त्‍यांनी हा व्‍हिडिओ शेअर करत केलेल्‍या पोस्‍टमध्‍ये मुलीचे कौतुक करताना लिहिले आहे की, ” आणि प्रत्येक वेळी आणि नंतर तुम्ही अशा व्हिडिओवर रेगांळता. तुम्हाला इच्छा होते: संपूर्ण जग असे का होऊ शकत नाही?”.

आनंद महिंद्रायांनी हा व्‍हिडिओ शेअर करतानच सोशल मीडिया वापरकर्त्यांनीही महिंद्रा यांच्‍या विचारांना उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद दिला आहे. “हे असे क्षण आहेत जे आपल्याला जगातील सौंदर्याची आठवण करून देतात,” एका वापरकर्त्याने लिहिले. “हे नक्कीच जग अधिक शांत, सुंदर आणि चांगले बनवते सर,” एकाने म्‍हटलं आहे. तर “हे जग सुंदर बनवण्यासाठी खूप कमी प्रयत्न करावे लागतात,” असे एका वापरकर्त्याने नमूद केले आहे.

हेही वाचा :

 

 

Back to top button