राता लंबिया : टांझानियातील भाऊ-बहिणीच्या व्हिडिओने धुमाकूळ (video) | पुढारी

राता लंबिया : टांझानियातील भाऊ-बहिणीच्या व्हिडिओने धुमाकूळ (video)

पुढारी ऑनलाईन डेस्क

राता लंबिया (Raataan Lambiyan) या गाण्याने अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. शेरशहा चित्रपटातील हे गाणे अजूनही संगीतप्रेमींसाठी आवडीचं ठरलेलं आहे. या गाण्याची व्याप्ती इतकी आहे की, राता लंबिया गाण्याने (Raataan Lambiyan) टांझानियामध्येही आपली जादू दाखवलीय. टांझानियातील एका भाऊ-बहिणीने या गाण्यावर लिप सिंक करत व्हिडिओ केलाय. या व्हिडिओने इन्स्टाग्रामवर अक्षरश: व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हीही म्हणाल, व्वा! सुंदरचं…

असं म्हणतात की, संगीताची कुठलीही सीमा असत नाही. राता लंबिया लंबिया हे गाणे शेरशहा चित्रपटातील आहे. ते सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा आडवाणी यांच्यावर चित्रीत करण्यात आले आहे. टांझानियाच्या भाऊ-बहिणीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर बघता बघता काही तासातंच व्हायरल झाला. इतकचं नाही तर या व्हिडिओवर सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा आडवाणीनेदेखील प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यांनी आपल्या इन्स्टा स्टोरीवर हा व्हिडिओ शेअर केलाय.

भाऊ-बहिणीने बनवला व्हिडिओ

टांझानियामध्ये राहणारे हे दोघे टिक टॉक क्रिएटर किली पॉल (Kili Paul) आणि त्याची बहिण नीमा आहे. त्यांनी ट्रॅडिशनल मासई (Maasai) ड्रेस परिधान केलेला दिसतोय. दोघे ‘रातां लंबियां’ गाण्यावर लिप सिंक करत एन्जॉय करताना दिसताहेत. खूप सहजपणे दोघे हिंदी गाणयावर लिंप सिंक करताना दिसताहेत. जो कुणी हा व्हिडिओ पाहत आहे, त्यांचे कौतुक करत आहेत.

शेअर केला व्हिडिओ

किलीने आपला व्हिडिओ पोस्ट करत लिहिलंय- We not done with this sound yet😍 ‘ सिद्धार्थ मल्होत्राने जेव्हा हा व्हिडिओ आपलया इन्स्टा स्टोरीवर री-शेअर केला तर किलीने लिहिलंय- ‘शुक्रिया. भारतसाठी खूप सारं प्रेम.’ हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर किलीच्या फॉलोअर्सची संख्या वाढू लागलीय, तिचे ८३ हजारहून अधिक फॉलोअर्स झाले आहेत.

युजर्स म्हणाले…

या व्हिडिओवर युजर्सकडून प्रतिक्रिया येत आहेत. एका युजरने लिहिलंय- ‘तुम्ही दोघे कमाल आहात.’ दुसऱ्या एकाने म्हटलंय- ‘सुपर-डुपर हिट आहे ब्रो.’ आणखी एका युजरने लिहिलंय-‘लव्ह द लिप सिंक.’

चित्रपट ‘शेरशाह’ मध्ये सिद्धार्थने शहीद कॅप्टन विक्रम बत्राची भूमिका साकारली होती. चित्रपट ॲमेझॉन प्राईम व्हिडिओवर हा चित्रपट रिलीज केला होता. ‘शेरशाह’ प्रेक्षकांच्या पसंतीसही उतरला होता. करण जोहरच्या प्रोडक्शनच्या या चित्रपटाचे दिग्दर्शन विष्णुवर्धन यांनी केलं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kili Paul (@kili_paul)

 

View this post on Instagram

 

A post shared by Kili Paul (@kili_paul)

 

View this post on Instagram

 

A post shared by Kili Paul (@kili_paul)

 

View this post on Instagram

 

A post shared by Kili Paul (@kili_paul)

 

View this post on Instagram

 

A post shared by Kili Paul (@kili_paul)

Back to top button