जळगाव : प्लॉट खरेदीच्या नावाखाली फसवणूक | पुढारी

जळगाव : प्लॉट खरेदीच्या नावाखाली फसवणूक

जळगाव : पुढारी वृत्तसेवा
भुसावळ हद्दीमध्ये प्लॉट देतो असे सांगून एका व्यक्तीकडून 18 लाख रोख घेतले. मात्र प्लॉट खरेदी न केल्याबाबत फसवणूकी प्रकरणी बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल झाल्यानंतर त्वरीत आरोपीस अटक करण्यात आली आहे.

भुसावळ शहरातील सर्वे नंबर 118/1/190/2/अ यामधील 79 नंबरचा प्लॉट, भुसावळ शहरातील अथांग बंगला इंद्रप्रस्थनगर येथे वास्तव्यास असणारे सागर शिवदास वानखेडे यांना घेऊन देतो असे आश्वासन देत आरोपी महेंद्र उर्फ विकी प्रकाश संसारे (रा. प्लॉट नंबर 16 किसान पेट्रोल पंपा जवळ, साखरी फाटा, वरणगाव रोड, भुसावळ) याने धनादेशाद्वारे रोखीने अठरा लाख रुपये घेतले.

मात्र 18 लाख रुपये राेख घेऊन देखील संसारे याने प्लॉट खरेदी करून दिला नाही. याबाबत वानखडे यांनी प्लॉट खरेदी झाला नाही तर दिलेले रोख पैसे परत मागितले. मात्र संसारे याने मीच तुम्हाला तीस लाख रुपये रोखीने दिलेले आहेत. असा खोटा आरोप करत तुमच्याकडे पाहून घेईन अशी धमकी दिली. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच सागर वानखेडे यांनी बाजारपेठ पोलिसात त्वरीत तक्रार दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून आरोपी महेंद्र उर्फ विकी संसारे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे. तर पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर पवार हे करीत आहेत.

हेही वाचा:

Back to top button