India vs England 3rd Test Day 3 : जैस्‍वालचे शतक, गिलचे अर्धशतक; भारताला ३२२ धावांची आघाडी | पुढारी

India vs England 3rd Test Day 3 : जैस्‍वालचे शतक, गिलचे अर्धशतक; भारताला ३२२ धावांची आघाडी

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारत आणि इंग्लंड यांच्यातील 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील राजकोट कसोटीतील तिसऱ्या दिवसाचा (दि. १७) खेळ संपला आहे. भारताने दुसऱ्या डावात 2 बाद 196 धावा केल्‍याने संघाला एकूण322 धावांची निर्णायक आघाडी मिळाली आहे. शुभमन गिल ६५ तर कुलदीप यादव ३ धावांवर खेळत आहेत. यशस्वी जैस्वाल 104 धावा करून रिटायर्ड हर्ट झाला. इंग्लंडकडून जो रूट आणि टॉम हार्टली यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली. भारताकडून कर्णधार रोहित शर्मा 19 धावांवर तर ​​रजत पाटीदार खाते न उघडता बाद झाला. टीम इंडियाने भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या डावात 445 धावा केल्या होत्या. तर इंग्‍लडचा पहिला डाव ३१९ धावांवर आटाेपला. (India vs England 3rd Test Day 3 )

दुसर्‍या डावात जैस्वालचे दमदार शतक, शुभमनचे अर्धशतक

तिसर्‍या दिवसाचा (१८ फेब्रुवारी) खेळ संपला तेव्‍हा भारताने २ गडी गमावत १९६ धावा केल्‍या.  यशस्वी जैस्वाल याने 122 चेंडूत ९ चौकार आणि ५ षटकारांची आतषबाजीत करत त्‍याने दमदार शतकी खेळी साकारली.  राेहित १९ धावांवर बाद झाल्‍यानंतर जैस्‍वाल आणि शुभमन यांनी डाव सावरला. या जाेडीच्‍या शतकी भागीदारीमुळे भारताने दुसऱ्या डावात 1 विकेट गमावून दीडेश धावांचा टप्‍पा पूर्ण केला. शुभमन गिलने याने फिरकीपटू मार्क वुडला षटकार ठोकत आपले अर्धशतक पूर्ण केले. यासह संघाच्या एकूण आघाडीने 300 धावांचा टप्पाही पार केला.

भारताला पहिला धक्‍का, रोहित शर्मा १९ धावांवर आऊट

जो रूटने दुसऱ्या डावात इंग्लंडला पहिले यश मिळवून दिले. त्याने टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माला यष्टीचीत केले. रोहित 28 चेंडूत 19 धावा करून बाद झाला. रोहितने पहिल्या डावात 131 धावा केल्या होत्या.

मोहम्मद सिराजने घेतले ४ बळीRemove featured image

तिसर्‍या दिवशी लंचनंतर इंग्‍लडचा पहिला डाव ३१९ धावांवर आटाेपला. पहिल्‍या डावात भारताकडून मोहम्मद सिराजने ४ बळी घेतले. रवींद्र जडेजा आणि कुलदीप यादव यांनी प्रत्‍येकी दोन तर जसप्रीत बुमराह आणि रविचंद्रन अश्विन यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली. इंग्लंडकडून बेन डकेट याने सर्वाधिक १५३ धावा केल्‍या. कर्णधार बेन स्टोक्स याने ४१ तर ऑली पोप याने ३९ धावांचे योगदान दिले. याशिवाय अन्‍य कोणत्‍याही फलंदाजाला 20 धावांचा टप्पाही पार करता आला नाही.

इंग्‍लंडचा डाव ३१९ धावांवर गुंडाळला

७१व्या षटकाचा टॉम हार्टलीला तंबूत धाडत रवींद्र जडेजाने इंग्लंडला 9वा धक्का दिला. हार्टले यष्टीचीत झाला. यानंतर ७२ व्‍या षटकातच्‍या पहिल्या चेंडूवर मोहम्मद सिराजने जेम्स अँडरसनला बोल्ड करत इंग्‍लंडचा डाव ३१९ धावांवर गुंडाळला. मार्क वुड ४ धावा करून नाबाद राहिला.

बेन स्टोक्स पाठाेपाठ फॉक्स आणि रेहान अहमदही तंबूत

लंचनंतर इंग्‍लडला सलग तीन धक्‍के बसले. रवींद्र जडेजाला षटकार मारण्याच्या प्रयत्नात इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स झेलबाद झाला. जसप्रीत बुमराहने त्याचा झेल घेतला. यष्टीरक्षक बेन फॉक्स 13 धावा करून मोहम्मद सिराजचा बळी ठरला. सिराजने 66व्या षटकातील पहिला चेंडूवर १३ धावांवर फलंदाजी करणार्‍या यष्‍टीरक्षक बेन फॉक्‍सला याला रोहित शर्माकरवी झेल बाद केले. याच षटकात इंग्लंडने 300 धावा पूर्ण केल्या. ७० व्‍या षटकामध्‍ये मोहम्मद सिराजने इंग्लंडला 8वा धक्का दिला. रेहान अहमदला त्‍याने क्‍लीन बोल्‍ड केले.

लंचपर्यंत इंग्लंड ५ बाद २९०; भारताकडे १५५ धावांची आघाडी

तिसऱ्या दिवशी लंच ब्रेकपर्यंत इंग्लंडने पहिल्या डावात पाच गडी गमावून 290 धावा केल्या आहेत. कर्णधार बेन स्टोक्स 39 धावांवर तर बेन फॉक्स 6 धावांवर नाबाद आहे. अश्विनच्या अनुपस्थितीमध्ये चार गोलंदाजांसह मैदानात उतरलेल्या भारतीय संघाला आजच्या पहिल्या सत्रात त्याची अनुपस्थिती जाणवली नाही. या सत्रात इंग्लंडने 26 षटकांत 83 धावा केल्या. भारतीय गोलंदाजांनी तीन बळी घेतले. यात जसप्रीत बुमराहच्या एका विकेट आणि कुलदीपने दोन विकेट घेतल्या.

बुमराहने रूटला (18) पॅव्हेलियनमध्ये पाठवले. तर कुलदीपने बेअरस्टोला खाते उघडू दिले नाही. यासह त्याने शतकवीर बेन डकेटलाही पॅव्हेलियनमध्ये पाठवले. डकेट १५३ धावा करून बाद झाला. फलंदाजी करताना भारताने पहिल्या डावात 445 धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लिश संघ अजूनही 155 धावांनी मागे आहे.

इंग्लंडचा निम्मा संघ तंबूत; बेन डकेट १५३ धावांवर बाद

इंग्लंडला 260 धावांवर पाचवा धक्का बसला. कुलदीप यादवच्या फिरकीने त्याने बेन डकेटला शुभमन गिलकरवी झेलबाद केले. डकेटने 151 चेंडूत 153 धावांची शानदार खेळी केली. आपल्या खेळीत त्याने 23 चौकार आणि दोन षटकार मारले. सध्या बेन स्टोक्स आणि बेन फॉक्स क्रीजवर आहेत.

जो रूट पाठोपाठ बेअरस्टो बाद

इंग्लंडने सलग दोन षटकात दोन विकेट गमावल्या आहेत. इंग्लिश डावाच्या 40व्या षटकात बुमराहने जो रूटला बाद केले होते. कुलदीप यादवने 41व्या षटकात जॉनी बेअरस्टोला एलबीडब्ल्यू आऊट केले. रूट 18 धावा करू शकला, तर बेअरस्टो खातेही उघडू शकला नाही. या मालिकेत दोन्ही खेळाडूंचा खराब फॉर्म कायम आहे. सध्या बेन डकेट आणि कर्णधार बेन स्टोक्स क्रीजवर आहेत. इंग्लंडची धावसंख्या चार विकेटवर २२५ धावा आहे.

इंग्लंडला तिसरा धक्का; जो रूट बाद

इंग्लंडला 224 धावांवर तिसरा धक्का बसला. तिसऱ्या दिवशी इंग्लिश संघाला हा पहिला धक्का आहे. जसप्रीत बुमराहने जो रूटला यशस्वी जैस्वालकरवी झेलबाद केले. बुमराहने रुटला कसोटीत नवव्यांदा बाद केले. रूटचा खराब फॉर्म सुरूच आहे. आत्तापर्यंत तो या मालिकेत विशेष कामगिरी करू शकलेला नाही.

इंग्लंड संघ पहिल्या डावात 238 धावांनी पिछाडीवर

इंग्लंडकडून बेन डकेट नाबाद 133 आणि जो रूट 9 धावांवर नाबाद आहे. यांनी दोघांनी तिसऱ्या दिवशी खेळाला सुरुवात केली आहे. भारतीय संघाकडून आतापर्यंत फिरकीपटू रविचंद्रन अश्विन आणि वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज यांनी प्रत्येकी 1 बळी घेतला आहे. अश्विनच्या कसोटी कारकिर्दीतील हा 500 वा विकेटही ठरला.

इंग्लंडचा संघ पहिल्या डावात अद्याप 238 धावांनी मागे आहे. अशा स्थितीत सध्या हा सामना दोन्ही संघांमध्ये बरोबरीच्या मार्गावर आहे. या दृष्टीने हा तिसरा दिवस खूप खास आणि निर्णायक असणार आहे. भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज, फिरकीपटू रवींद्र जडेजा आणि कुलदीप यादव यांच्या व्यतिरिक्त चांगली कामगिरी केली तर सामना भारताच्या बाजूने होऊ शकतो.

हेही वाचा :

Back to top button