Breaking : प्रजासत्ताक दिनी महाराष्ट्राच्या चित्ररथातून होणार नारी शक्तीचे दर्शन | पुढारी

Breaking : प्रजासत्ताक दिनी महाराष्ट्राच्या चित्ररथातून होणार नारी शक्तीचे दर्शन

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारत ७५ वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी सज्ज झाला आहे. प्रजासत्ताक दिन २०२४ रोजी महाराष्ट्राच्या चित्ररथातून नारी शक्तीचे दर्शन होणार आहे. प्रत्येक वर्षीप्रमाणे यावेळी महाराष्ट्र राज्याचा चित्ररथ लक्ष वेधून घेणारा ठरेल. चित्ररथात यावर्षी राजमाता जिजाऊंचा समावेश करण्यात आला आहे, असे वृत्त ‘पुढारी न्यूज’ वृत्तवाहिनीने दिले आहे.

संबंधित बातम्या –

महाराष्ट्राने अनेकवेळा चित्ररथाच्या माध्यमातून महाराष्ट्रीय परंपरेचे दर्शन घडविले आहे. राज्याच्या चित्ररथाला १२ वेळा उत्कृष्ट चित्ररथासाठीचा पुरस्कारदेखील मिळाला आहे.

प्रजासत्ताक सोहळ्यातील पथसंचलन हा एक महत्त्वाचा भाग आहे. ध्वजवंदन, तिन्ही दलाची परेड, साहसी दृश्ये, चित्ररथांचे संचलन, पुरस्कार, भाषण अशा सर्व बाबींचा समावेश या सोहळ्यात असतो. पथसंचलनात हवाई दल, नौदल आणि सैन्य दलाच्या वेगवेगळ्या रेजिमेंट्सचा समावेश असतो. यापैकी भारतातील विविध राज्यांचे चित्ररथांचे संचलन हा देखील एक महत्त्वाचा भाग असतो. यावेळच्या प्रजासत्ताक दिनी महाराष्ट्राचे चित्ररथ सर्वांचे लक्ष वेधणारे ठरणार आहे. यंदा नारी शक्तीचे दर्शन घडवणाऱ्या चित्ररथाचा समावेश संचलनात असणार आहे.

महाराष्ट्र राज्याने आतापर्यंत सामाजिक, सांस्कृतिक, पर्यटन, संत परंपरा, वारी, अशा अनेकविध विषयांवर आधारीत चित्ररथाच्या माध्यमातून सादरीकरण केले आहे. यामध्ये राज्याने आतापर्यंत १२ वेळा पुरस्कार पटकावले आहेत.

Back to top button