पुढारी ऑनलाईन डेस्क : आम आदमी पक्षाने 'वन नेशन, वन इलेक्शन' या विषयावर आपले मत उच्चस्तरीय समितीकडे विचारार्थ पाठवले आहे. आपचे राष्ट्रीय सचिव पंकज गुप्ता यांनी वन नेशन, वन इलेक्शन या उच्चस्तरीय समितीचे सचिव नितेन चंद्रा यांना पत्र लिहिले आहे. 'एक देश, एक निवडणूक' या कल्पनेला आम आदमी पक्ष ठाम विरोध करणार असल्याचे आपने या पत्रात म्हटले आहे. One Nation One Election
त्यांनी पत्रात लिहिले आहे की, 'वन नेशन वन इलेक्शन'मुळे संसदीय लोकशाहीची कल्पना, राज्यघटनेची मूलभूत रचना आणि देशाच्या संघराज्यीय राजकारणाला हानी पोहोचेल. 'वन नेशन वन इलेक्शन' त्रिशंकू विधानसभेला सामोरे जाण्यास असमर्थ आहे. आणि पक्षांतरविरोधी आणि आमदार, खासदारांच्या खुल्या घोडेबाजाराला प्रोत्साहन देईल. एकाचवेळी निवडणुका घेऊन जो खर्च वाचवण्याचा प्रयत्न केला जात आहे, तो भारत सरकारच्या वार्षिक बजेटच्या फक्त ०.१ टक्के आहे. One Nation One Election
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी शुक्रवारी 'वन नेशन-वन इलेक्शन' या विषयावर स्थापन केलेल्या उच्चस्तरीय समितीला पत्र लिहिले आहे. पत्रात त्यांनी म्हटले आहे की, संसदीय शासन पद्धती स्वीकारलेल्या देशात एकाचवेळी निवडणुका घेण्याच्या कल्पनेला स्थान नाही. आणि याला काँग्रेस कडाडून विरोध करेल.
खरगे यांनी हे पत्र उच्चस्तरीय समितीचे सचिव नितेन चंद्रा यांना पाठवले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, एकाच वेळी निवडणुका घेण्याची कल्पना संविधानाच्या मूलभूत रचनेच्या विरोधात आहे. एकाचवेळी निवडणुका घेण्याची पद्धत राबवायची असेल, तर राज्यघटनेच्या मूलभूत रचनेत मोठे बदल करावे लागतील. ते पुढे म्हणाले की, ज्या देशात संसदीय शासनप्रणाली स्वीकारली गेली आहे, तेथे एकाचवेळी निवडणुका घेण्याच्या कल्पनेला स्थान नाही. एकाच वेळी निवडणुका घेण्याचे सरकारचे स्वरूप हे घटनेत समाविष्ट केलेल्या संघराज्याच्या हमीविरुद्ध आहे.
हेही वाचा