Earthquake : लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का; नागरिकांत घबराट | पुढारी

Earthquake : लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का; नागरिकांत घबराट

तानाजी माटे

लोहारा : लोहारा तालुक्यात मकर संक्रांती सणादिवशी भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला. आज (दि.१५) सायंकाळी ५ वाजून २३ मिनिटाच्या सुमारास धक्का जाणवला. दिल्ली येथील भूकंप मापन केंद्रात २. ३ रिस्टर स्केलचा भूकंप झाल्याची नोंद झाली आहे.   Earthquake

लोहारा तालुका हा भूकंपग्रस्त तालुका असून भुकंप प्रवण क्षेत्रात येतो. १९९३ साली झालेल्या महाप्रलंयकरी भूकंपाच्या कटू आठवणी अजून नागरिक विसरलेले नाहीत. अधूनमधून तालुक्याला भुकंपाचे धक्के जाणवत आहेत. त्यामुळे तालुक्यातील सास्तुर, माकणीसह परिसरात आजही भीतीचे वातावरण आहे. Earthquake

लोहारा तालुक्यात आज मकर संक्रांतीचा सण साजरा होत असतानाच सायंकाळी ५ वाजून २३ मिनिटाच्या सुमारास सास्तुरसह माकणी, होळी, राजेगाव, धानुरी, चिंचोली काटे, खेड, करजगाव, तावशीगड, परिसराला भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला असल्याचे स्थनिक ग्रामस्थांनी सांगितले. यावेळी जमिनीतून गूढ आवाज कानावर पडताच नागरिकांनी घराबाहेर धाव घेतली. तर धक्क्याने कपाटावरील भांडी दणाणली.

या सौम्य भूकंपाच्या धक्क्याची दिल्ली येथील भूकंप मापन केंद्रात २. ३ रिस्टर स्केलची नोंद झाल्याची माहिती कुलाबा मौसम विभागातील वैज्ञानिक (अ) किरण नारखेडे यांनी दिली आहे.

हेही वाचा 

Back to top button