औरंगाबाद, उस्मानाबादच्या नामांतरणास केंद्राची मंजुरी; संभाजीनगर, धाराशीवला मान्यता

औरंगाबाद, उस्मानाबादच्या नामांतरणास केंद्राची मंजुरी; संभाजीनगर, धाराशीवला मान्यता

औरंगाबाद; पुढारी ऑनलाईन : औरंगाबाद आणि उस्मानाबाद या दोन शहरांची नावे बदलण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला केंद्र सरकारने मंजुरी दिली असून यापुढे ही दोन शहरे छत्रपती संभाजीनगर आणि धाराशीव या नावाने ओळखली जाणार आहे. दोन्ही शहरांची नावे बदलण्याची मागणी दीर्घकाळापासून केली जात होती. राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर या सरकारने दोन्ही शहरांची नावे बदलण्याचा निर्णय घेतला होता.

औरंगाबाद आणि उस्मानाबाद या शहरांची नावे बदलण्याचा निर्णय घेतल्यानंतर राज्य सरकारने अंतिम मंजुरीसाठी त्याबाबतचे पत्र 20 ऑक्टोबर 2022 रोजी केंद्र सरकारकडे पाठविले होते. त्याला आता केंद्राने मंजुरी दिली आहे. दोन्ही शहरांची नावे बदलण्यास मंजुरी मिळाल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडीयाच्या माध्यमातून सांगितले. फडणवीस यांनी याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे आभार मानले आहेत. 'एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने करुन दाखविले' अशी प्रतिकि्रयाही फडणवीस यांनी दिली आहे.

दोन्ही शहरांची नावे बदलण्याचा मुद्दा राजकारणाचा विषय झाला होता. नव्वदच्या दशकांत हिंदू ह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी औरंगाबादचे नाव बदलून 'संभाजीनगर' असे करण्याची मागणी केली होती. त्यानंतर शिवसेनेकडून प्रत्येक ठिकाणी संभाजीनगर असाच उल्लेख केला जात होता. तर दुसरीकडे उस्मानाबादचा उल्लेख 'धाराशीव' असा केला जात होता. मुगल बादशहा औरंगजेब याने छत्रपती संभाजीराजे यांची हत्या केली होती. त्यामुळे औरंगाबाद हे नाव हटविले जावे, अशी मागणी हिंदुत्ववादी संघटनांकडून देखील सातत्याने केली जात होती.

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली करुन दाखवलं : देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली करुन दाखवलं अशी प्रतिक्रीया राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करत दिली आहे. या निर्णयाबाबत त्यांनी केंद्र सरकारचे आभार मानले आहेत. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री अमित शहा यांचे आभार मानत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली करुन दाखवलं अशी प्रतिक्रीया दिली आह.

आंनदी आनंद गडे : सुधीर मुनगंटीवार

राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या निर्णयाबाबत 'आनंदी आनंद गडे' अशी प्रतिक्रीया देत या निर्णयाचे स्वागत करत आनंद व्यक्त केले आहे. यासह औरंगाबादचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी सुद्धा या निर्णयाचे स्वागत केले आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सर्वात प्रथम औरंगाबादचे नाव संभाजी नगर आणि उस्मानाबादचे धाराशीव करणार असे म्हटले होते. त्यांनी या शहराच्या नामांतरणाची मागणी ठेवली आणि ती आज सत्यात उतरली अशी प्रतिक्रीया यावेळी खैरे यांनी दिली.

औरंगाबादच्या नामांतराची पार्श्वभूमी….

  • हिंदू ह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी औरंगाबाद येथील मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या सभेत शहराचे नाव संभाजीनगर नामकरण करण्याचा नारा दिला.
  • 1995 साली औरंगाबादचे नामकरण संभाजीनगर करावे, असा ठराव महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंजूर करुन तो राज्य सरकारकडे पाठविण्यात आला. त्यावेळी सेना-भाजप युतीचे सरकार असल्यामुळे नामकरणाची अधिसूचना काढण्यात आली
  • 1996 साली मुश्ताक अहमद यांनी नामकरणाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. नंतर ती याचिका निकाली निघाली.
  • पुढे 1999 साली राज्यात सत्तांतर होऊन युतीचे सरकार गेले. त्यामुळे नामकरणाचा मुद्दा पुढे सरकला नाही.
  • 2021 साली 'सुपर संभाजीनगर' असे फलक शहरात ठिकठिकाणी लागले. त्यात पालक मंत्र्यांच्या सरकारी दौऱ्यात संभाजीनगर असे छापून आल्याने वादा निर्माण झाला.
  • जून 2022 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी नामकरणाचा मुद्दा मार्गी लावू, असे सांगितले.
  • 29 जून 2022 रोजी ठाकरे सरकारने औरंगाबादचे संभाजीनगर तर उस्मानाबादचे धाराशीव हे नाव बदलण्याचा निर्णय घेतला.
  • सत्ता संघर्षादरम्यान ठाकरे यांनी राजीनामा दिला व एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री बनले. शिंदे यांनी आधीच्या ठाकरे सरकारचा निर्णय रद्दबातल केला. त्यानंतर 16 जुलै 2022 रोजी नव्या सरकारने औरंगाबाद शहराचे नामकरण संभाजीनगर असे करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली.

अधिक वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news