जगात भारी कोल्हापूरी ; दोन लाखातून उदगावचा फोटो जगभरी | पुढारी

जगात भारी कोल्हापूरी ; दोन लाखातून उदगावचा फोटो जगभरी

जयसिंगपूर; संतोष बामणे

महापूरात जयसिंगपूर येथील छायाचित्रकार कृष्णा मसलकर यांनी उदगांव (ता.शिरोळ) येथे महापूरात आलेले पाणी आणि यात एक मुलगी हातपंपचे पाणी, असे बोलके छायाचित्र आपल्या कॅमेरेत कैद केले होते. तर दुबईचा राज्याने एचआयपी या संस्थेच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय फोटोग्राफर स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेत 2 लाख फोटो संकलित झाले होते. यातून छायाचित्रकार कृष्णा मसलकर यांच्या फोटोला विशेष प्राविण्य मिळून तो फोटो जगभरात प्रसिध्द करण्यात आला आहे.

सोशल मीडिया, टीव्ही व इंटरनेटच्या माध्यमातून आपण वेगवेगळे फोटो पाहत असतो.प्रत्येक छायाचित्रकार हा वेगळ्या क्लिकच्या शोधात असतो. महापूराच्या काळात कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील अजित चौगुले, अरुण चौगुले, कृष्णा मसलकर, सुरेश मेंगे, सुभाष जाधव, अक्षय मगदूम, राज पडीयार, महेश दौडे यांच्यासह अनेक छायाचित्रकारांनी हजारो फोटो काढले आहेत.

छायाचित्रकारांना प्रोत्साहन देण्यासाठी दुबईचे राजे हमाद बिन यांच्याकडून आंतरराष्ट्रीय फोटो स्पर्धाचे अयोजन केले जाते.या स्पर्धेत जगातील सुमारे 2 लाख छायाचित्रकारांनी भाग घेतला होता. यामध्ये जयसिंगपूर येथे छायाचित्रकार कृष्णा मसलकर यांनी भाग घेवून 2019-20 साठी वॉटर थीम व्दारे सादर केलेला उदगांव येथील फोटोला जगात विशेष प्राविण्य मिळाले आहे. हा फोटो उदगांव येथील कृष्णा नदीला महापूर आला होता. यावेळी संत रोहिदास नगरमध्ये महापूर आला होता. सर्वत्र पाणी दिसत असताना एक मुलगी हातपंपाच्याव्दारे पाणी उपसून ती पित आहे, असा हा बोलका फोटो मसलकर यांनी या स्पर्धेसाठी सादर केला होता. त्याला आता दुबईच्या संस्थेकडून जगभरात प्रसिध्दी दिली आहे. त्यामुळे उदगांवच्या या फोटोमुळे छायाचित्रकारांना प्रोत्साहन मिळणार आहे.

हेही वाचलं का?

मी छायाचित्रकार असून, प्रत्येक ठिकाणचे फोटो क्लिक करण्याचा मला छंद आहे. मी यापूर्वी या संस्थेकडे अनेक फोटो स्पर्धेसाठी पाठविले हाेते. मात्र, या महापूरातील उदगांव येथील काढलेले फोटो आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पाठविल्यानंतर त्याला जगभरात प्रसिध्दी देण्यात आले आहे. याचे मला समाधान वाटते. यापुढेही वेगळे फोटो घेण्यासाठी प्रयत्न करीन.

-कृष्णा मसलकरक, छायाचित्रकार जयसिंगपूर

हेही वाचलंत का?

Back to top button