कोल्हापूर : भात हमीभाव नोंदणीसाठी मुदतवाढ | पुढारी

कोल्हापूर : भात हमीभाव नोंदणीसाठी मुदतवाढ

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा

हमीभावाने भात विक्री नोंदणीसाठी दि.30 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. ज्या शेतकर्‍यांनी अद्याप नोंदणी केलेली नाही, त्या शेतकर्‍यांनी मार्केटिंग फेडरेशनच्या वतीने सुरू केलेल्या सात नोंदणी कार्यालयात अथवा कोल्हापूर व गडहिंग्लज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा मार्केटिंग अधिकारी चंद्रकांत खाडे यांनी केले आहे.

राज्य मार्केटिंग फेडरेशनच्या जिल्हा कार्यालयामार्फत शेतकर्‍यांकडून हमीभावाने भात खरेदी केला जाणार आहे. याकरिता चंदगड तालुका खरेदी-विक्री संघ लि. मार्फत, तुर्केवाडी, चंदगड तालुका सहकारी कृषी माल फलोत्पादन संघ लि., अडकूर, आजरा किसान सहकारी भात खरेदी-विक्री संघ मर्या. आजरा, राधानगरी तालुका शेतकरी सहकारी खरेदी-विक्री संघ मर्या-सरवडे, भुदरगड तालुका सहकारी खरेदी-विक्री संघ गारगोटी (भुदरगड), दि महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन लि.-जिल्हा मार्केटिंग अधिकारी कार्यालय, कोल्हापूर व कोल्हापूर जिल्हा सहकारी खरेदी-विक्री संघ कोल्हापूर-बामणी (ता. कागल) या सात ठिकाणी नोंदणी केंद्रे सुरू केली आहे.

या सात केंद्रांवर शेतकर्‍यांना नोंदणी करता येणार आहे. नोंदणीकरिता शेतकर्‍यांनी चालू खरीप हंगाम 2021-22 मधील धान (भात) पीक लागवडीची नोंद असलेल्या डिजिटल स्वाक्षरीचा सातबाराचा व 8-अ चा मूळ उतारा प्रत, आधार कार्ड व बँक पासबुक झेरॉक्सची आवश्यकता आहे, असेही खाडे यांनी सांगितले.

पाहा व्हिडिओ : महाराष्ट्राला हसवणाऱ्या अभिनेत्री निर्मीती सावंत यासाठी रडतात

Back to top button