Pune ZP : जिल्हा परिषदेची आजची सर्वसाधारण सभा ठरणार वादळी! | पुढारी

Pune ZP : जिल्हा परिषदेची आजची सर्वसाधारण सभा ठरणार वादळी!

पुणे : पुढारी वृत्तसेवा

पुणे जिल्हा (Pune ZP) परिषदेची गेल्या सोमवारी तहकूब झालेली सभा आज सोमवारी (दि २२) ला होणार आहे. या सभेत महापालिकेत समाविष्ट झालेल्या २३ गावांतील नोकर भरती प्रकरण, चिक्की प्रकरण, जिल्हा परिषदेतील शाळांचा वीज पुरवठा खंडीत प्रकणावर वादळी ठरण्याची शक्यता आहे.

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे निधन झाल्याने गेल्या सोमवारची सभा त्यांना श्रद्धांजली अर्पण करुन तहकूब करण्यात आली होती. ही तहकूब झालेली सर्वसाधारण सभा सोमवारी (दि २२) आयोजित करण्यात आली आहे.  या सभेत ग्रामपंचायतीत समाविष्ट झालेल्या २३ ग्रामपंचायतीत नाेकरभरतीत झालेल्या भ्रष्टाचार, चिक्की प्रकरण, देहू येथील आरो प्लँट हस्तांतरण तसेच जिल्हा परिषदेच्या शाळांचे तोडलेली वीज हे प्रश्न प्रामुख्याने चर्चीले जाणार असून, विरोधक या मुद्दावरून सत्ताधाऱ्यांना घेरण्याची शक्यता आहे.

नोकर भरतीत बड्यांचा हस्तक्षेप असल्याने, तसेच चौकशी समितीच्या अधिकारी निवडीवरून ही समिती वादळी ठरणार आहे. या सर्वांना सत्ताधारी कशा पद्धतीने सामोरे जाणार हे पाहणे ओत्सुक्याचे ठरणार आहे. दरम्यान, पुणे महानगरपालिकेत समाविष्ट २३ गावांतील बौगस भरती प्रकरणाची चौकशी सध्या सुरू आहे. हा घोटाळा तब्बल ३० कोटींचा असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ही चौकशी थांबवावी या साठी काही जिल्हा परिषद (Pune ZP) सदस्यांना हाताशी धरुन घोटाळ्यात सहभागी असलेल्या ग्रामसेवकांनी काही दिवसांपूर्वी गुप्त बैठक घेतली असून, त्यात पैसे गोळा करण्याचे ठरल्याची चर्चा जिल्हा परिषदेच्या इमारतीत सुरू आहे.

हेही वाचलं का?

Back to top button