"मुंबई : पुढारी वृत्तसेवा" image="http://"][/author]
एस.टी. महामंडळात प्रामाणिकपणे सेवा दिल्यानंतर आमचे भविष्य अंधारात दिसत आहे. आमच्याप्रमाणे लेकरांचे आणि कुटुंबाचे भविष्य खराब करणार नाही. सधन भविष्यासाठी शासकीय कर्मचार्यांप्रमाणे वेतन हवे आहे. म्हणूनच एस.टी. महामंडळाचे शासनात विलीनीकरण करत नाही, तोपर्यंत मुंबई सोडणार नसल्याचा निर्धार बिकट परिस्थितीत सहकुटुंब आझाद मैदानात ठिय्या देणार्या एस.टी. कामगारांनी व्यक्त केला आहे.
अवघ्या 9 वर्षांच्या पोटच्या पोरीसह तासगाव आगारातील महिला वाहक स्वाती सरवदे या गेल्या 12 दिवसांपासून आझाद मैदानात आंदोलनाला बसल्या आहेत. आमचे भविष्य अंधारमय असले, तरी मुलीचे भविष्य खराब होऊ देणार नाही, अशी भावनिक प्रतिक्रिया त्यांनी दैनिक 'पुढारी'शी बोलताना व्यक्त केली.
त्या म्हणाल्या की, गेल्या 13 वर्षांपासून एस.टी.ची इमानेइतबारे सेवा करत आहे. मात्र, किमान वेतनाइतकाही पगार मिळत नाही. पुण्याच्या एका खासगी कंपनीत कंत्राटी कामगार म्हणून पती काम करतात. त्या स्वतः तासगावला राहतात. भाड्याच्या खोलीत राहून संसार करताना मासिक खर्चाची जमवाजमव करतानाच तोंडाला फेस येतो.
मुलीच्या भविष्याच्या विचार केला, तर पैशांचा प्रश्न आडवा येतो. तिच्यासाठी महागाईचे खाणे घेऊन जाण्यासाठी खिशात पैसेच नसतात. म्हणून पाच-दहा रुपयांचे थातूर-मातूर काही तरी न्यावे लागते. म्हणूनच मुलीच्या भविष्यासाठी विलीनीकरण होऊन चांगले वेतन मिळत नाही, तोपर्यंत संपातून माघार घेणार नसल्याचा निश्चय त्यांनी यावेळी व्यक्त केला.
मान आणि धन अशा दोन्ही स्तरांवर एस.टी. महामंडळाकडून पदरात उपेक्षाच पडल्याची प्रतिक्रिया आपल्या असामान्य सेवेसाठी प्रसिद्ध असलेले श्रींगोदा आगारातील वाहक सोपान जवने यांनी व्यक्त केली.
मराठी, हिंदी व इंग्रजी अशा तिन्ही भाषांमध्ये लालपरीमध्ये प्रवाशांचे स्वागत करणारे सोपान जवने त्यांच्या हटके सेवेसाठी ओळखले जातात. त्यांच्यासोबत एस.टी.मधून प्रवास करताना प्रवाशांना विमानातून प्रवास करत असल्याचा भास होतो. प्रवासात प्रवाशांना मार्गदर्शन आणि विचारपूस करून वाहकाने कशाप्रकारे आदरातिथ्य करावे, याचे ते जिवंत उदाहरण आहेत.
सांगलीच्या तासगाव आगारातील राघिनी जाधव या त्यांच्या पतीसह गेल्या 12 दिवसांपासून आझाद मैदानात ठाण मांडून आहेत. दोन्ही मुलांना उच्च शिक्षण पुरवताना कर्ज काढण्यावाचून दुसरा पर्याय नसल्याचे त्यांनी सांगितले.
एस.टी. महामंडळात प्रामाणिकपणे सेवा दिल्यानंतर आमचे भविष्य अंधारात दिसत आहे. आमच्याप्रमाणे लेकरांचे आणि कुटुंबाचे भविष्य खराब करणार नाही. सधन भविष्यासाठी शासकीय कर्मचार्यांप्रमाणे वेतन हवे आहे. म्हणूनच एस.टी. महामंडळाचे शासनात विलीनीकरण करत नाही, तोपर्यंत मुंबई सोडणार नसल्याचा निर्धार बिकट परिस्थितीत सहकुटुंब आझाद मैदानात ठिय्या देणार्या एस.टी. कामगारांनी व्यक्त केला आहे.
अवघ्या 9 वर्षांच्या पोटच्या पोरीसह तासगाव आगारातील महिला वाहक स्वाती सरवदे या गेल्या 12 दिवसांपासून आझाद मैदानात आंदोलनाला बसल्या आहेत. आमचे भविष्य अंधारमय असले, तरी मुलीचे भविष्य खराब होऊ देणार नाही, अशी भावनिक प्रतिक्रिया त्यांनी दैनिक 'पुढारी'शी बोलताना व्यक्त केली.
त्या म्हणाल्या की, गेल्या 13 वर्षांपासून एस.टी.ची इमानेइतबारे सेवा करत आहे. मात्र, किमान वेतनाइतकाही पगार मिळत नाही. पुण्याच्या एका खासगी कंपनीत कंत्राटी कामगार म्हणून पती काम करतात. त्या स्वतः तासगावला राहतात. भाड्याच्या खोलीत राहून संसार करताना मासिक खर्चाची जमवाजमव करतानाच तोंडाला फेस येतो.
मुलीच्या भविष्याच्या विचार केला, तर पैशांचा प्रश्न आडवा येतो. तिच्यासाठी महागाईचे खाणे घेऊन जाण्यासाठी खिशात पैसेच नसतात. म्हणून पाच-दहा रुपयांचे थातूर-मातूर काही तरी न्यावे लागते. म्हणूनच मुलीच्या भविष्यासाठी विलीनीकरण होऊन चांगले वेतन मिळत नाही, तोपर्यंत संपातून माघार घेणार नसल्याचा निश्चय त्यांनी यावेळी व्यक्त केला.
मान आणि धन अशा दोन्ही स्तरांवर एस.टी. महामंडळाकडून पदरात उपेक्षाच पडल्याची प्रतिक्रिया आपल्या असामान्य सेवेसाठी प्रसिद्ध असलेले श्रींगोदा आगारातील वाहक सोपान जवने यांनी व्यक्त केली. मराठी, हिंदी व इंग्रजी अशा तिन्ही भाषांमध्ये लालपरीमध्ये प्रवाशांचे स्वागत करणारे सोपान जवने त्यांच्या हटके सेवेसाठी ओळखले जातात. त्यांच्यासोबत एस.टी.मधून प्रवास करताना प्रवाशांना विमानातून प्रवास करत असल्याचा भास होतो. प्रवासात प्रवाशांना मार्गदर्शन आणि विचारपूस करून वाहकाने कशाप्रकारे आदरातिथ्य करावे, याचे ते जिवंत उदाहरण आहेत.
सांगलीच्या तासगाव आगारातील राघिनी जाधव या त्यांच्या पतीसह गेल्या 12 दिवसांपासून आझाद मैदानात ठाण मांडून आहेत. दोन्ही मुलांना उच्च शिक्षण पुरवताना कर्ज काढण्यावाचून दुसरा पर्याय नसल्याचे त्यांनी सांगितले.
एस.टी. महामंडळात प्रामाणिकपणे सेवा दिल्यानंतर आमचे भविष्य अंधारात दिसत आहे.
आमच्याप्रमाणे लेकरांचे आणि कुटुंबाचे भविष्य खराब करणार नाही. सधन भविष्यासाठी शासकीय कर्मचार्यांप्रमाणे वेतन हवे आहे. म्हणूनच एस.टी. महामंडळाचे शासनात विलीनीकरण करत नाही, तोपर्यंत मुंबई सोडणार नसल्याचा निर्धार बिकट परिस्थितीत सहकुटुंब आझाद मैदानात ठिय्या देणार्या एस.टी. कामगारांनी व्यक्त केला आहे.
अवघ्या 9 वर्षांच्या पोटच्या पोरीसह तासगाव आगारातील महिला वाहक स्वाती सरवदे या गेल्या 12 दिवसांपासून आझाद मैदानात आंदोलनाला बसल्या आहेत. आमचे भविष्य अंधारमय असले, तरी मुलीचे भविष्य खराब होऊ देणार नाही, अशी भावनिक प्रतिक्रिया त्यांनी दैनिक 'पुढारी'शी बोलताना व्यक्त केली. त्या म्हणाल्या की, गेल्या 13 वर्षांपासून एस.टी.ची इमानेइतबारे सेवा करत आहे
. मात्र, किमान वेतनाइतकाही पगार मिळत नाही. पुण्याच्या एका खासगी कंपनीत कंत्राटी कामगार म्हणून पती काम करतात. त्या स्वतः तासगावला राहतात. भाड्याच्या खोलीत राहून संसार करताना मासिक खर्चाची जमवाजमव करतानाच तोंडाला फेस येतो. मुलीच्या भविष्याच्या विचार केला, तर पैशांचा प्रश्न आडवा येतो
. तिच्यासाठी महागाईचे खाणे घेऊन जाण्यासाठी खिशात पैसेच नसतात. म्हणून पाच-दहा रुपयांचे थातूर-मातूर काही तरी न्यावे लागते. म्हणूनच मुलीच्या भविष्यासाठी विलीनीकरण होऊन चांगले वेतन मिळत नाही, तोपर्यंत संपातून माघार घेणार नसल्याचा निश्चय त्यांनी यावेळी व्यक्त केला.
मान आणि धन अशा दोन्ही स्तरांवर एस.टी. महामंडळाकडून पदरात उपेक्षाच पडल्याची प्रतिक्रिया आपल्या असामान्य सेवेसाठी प्रसिद्ध असलेले श्रींगोदा आगारातील वाहक सोपान जवने यांनी व्यक्त केली. मराठी, हिंदी व इंग्रजी अशा तिन्ही भाषांमध्ये लालपरीमध्ये प्रवाशांचे स्वागत करणारे सोपान जवने त्यांच्या हटके सेवेसाठी ओळखले जातात.
त्यांच्यासोबत एस.टी.मधून प्रवास करताना प्रवाशांना विमानातून प्रवास करत असल्याचा भास होतो. प्रवासात प्रवाशांना मार्गदर्शन आणि विचारपूस करून वाहकाने कशाप्रकारे आदरातिथ्य करावे, याचे ते जिवंत उदाहरण आहेत.