बार्टीने काढलेली ती ‘ई निविदा’ अखेर रद्द; विविध संघटनांच्या मागणीला यश | पुढारी

बार्टीने काढलेली ती ‘ई निविदा’ अखेर रद्द; विविध संघटनांच्या मागणीला यश

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  कोरेगाव भीमा येथील शौर्य दिनानिमित्त विजय स्तंभाला अभिवादन करण्यासाठी लाखो अनुयायांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) यांच्या भोजन पुरविण्यासंदर्भातील ‘ई निविदा’ रद्द करण्यात आली आहे, अशी माहिती बार्टीचे महासंचालक सुनील वारे यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिली आहे.

बार्टीकडून अभिवादन कार्यक्रमात सुमारे 50 हजार अनुयायांना भोजन उपलब्ध करून देण्याची तरतूदही करण्यात आली होती. त्यासाठी बार्टीमार्फत ई-निविदा प्रक्रिया राबविण्यात आली होती. बार्टी ही संस्था विद्यार्थ्यांच्या शिक्षण आणि संशोधनासाठी कार्यरत आहे, त्यामुळे भोजनासाठी हा बार्टीचा निधी वापरू नये, अशी मागणी विविध संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत केली होती. त्या वेळी प्रशासनाकडून योग्य ती कारवाई केली जाईल, असे आश्वासन देण्यात आले होते. कोरेगाव भीमा येथील शौर्य दिन काही तासांवर येऊन ठेपला असून, त्यातच बार्टीचे महासंचालक वारे यांनी ही निविदा प्रक्रिया रद्द केल्याचे जाहीर केले आहे.

हेही वाचा

Back to top button