जळगाव जिल्ह्यातील १६२ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम घोषित | पुढारी

जळगाव जिल्ह्यातील १६२ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम घोषित

जळगांव, पुढारी वृत्तसेवा

निधन, राजीनामा, अनर्हता किंवा इतर अन्य कारणांमुळे जळगाव जिल्ह्यातील रिक्त झालेल्या 162 ग्रामपंचायती मधील 229 जागा रिक्त झाल्या होत्या. या पार्श्वभुमीवर जळगाव पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. 17 नोव्हेंबर 2021 रोजीच्या आदेशानुसार राज्य निवडणूक आयोगाकडून घोषित करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.

पोटनिवडणूक कार्यक्रम असा असणार

नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गाची अतिरिक्त ठरलेली रिक्त जागा सर्वसाधारण जागा म्हणून अधिसूचित करण्यासाठी पूर्वी सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रसिध्द केलेल्या अंतिम प्रभाग रचनेच्या अधिसूचनेनुसार सुधारणा करण्याचा सोमवार 22 नोव्हेंबर 2021 पर्यंत राहील.

22 नोव्हेंबर 2021 रोजी तहसिलदार निवडणुकीची अधिसूचना प्रसिध्द करतील

30 नोव्हेंबर 2021 ते 6 डिसेंबर 2021 रोजी सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत नमुना ‘अ’ मध्ये नमूद ठिकाणी नामनिर्देशनपत्रे मागविता व सादर करता येतील.

7 डिसेंबर 2021 रोजी सकाळी 11 वाजलेपासून नामनिर्देशनपत्र छाननी केली जाणार

9 डिसेंबर 2021 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत नामनिर्देशपत्र मागे घेता येईल

9 डिसेंबर 2021 रोजी दुपारी 3 वाजल्यानंतर निवडणूक चिन्ह नेमून देण्यात येतील. तसेच अंतिमरित्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिध्द करण्यात येईल.

21 डिसेंबर 2021 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत मतदान

22 डिसेंबर 2021 रोजी (मतमोजणीचे ठिकाण व वेळ जिल्हाधिकाऱ्यांच्या मान्येतेने तहसीलदार निश्चित करतील त्यानुसार राहील) मतमोजणी होणार

27 डिसेंबर 2021 रोजी निवडणुकीच्या निकालाची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात येईल.

रिक्त सदस्य पदांसाठी 12 नोव्हेंबर, 2021 रोजी प्रारुप मतदार यादी प्रसिध्दी करण्यात आली असून, सदरची मतदार यादी 18 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यातील 163 ग्रामपंचायतींमध्येही प्रसिध्दी केली आहे.

जिल्ह्यात पोटनिवडणूका होत असलेल्या ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्यापासून निवडणूकीचा निकाल जाहीर होईपर्यंत आचारसंहिता लागू राहणार असल्याचेही जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिलेल्या प्रसिध्दी पत्रकार म्हंटले आहे.

हे ही वाचा :

Back to top button