वाशिम जिल्हा परिषद : अध्यक्षपदी राष्ट्रवादीचे चंद्रकांतदादा ठाकरे बिनविरोध | पुढारी

वाशिम जिल्हा परिषद : अध्यक्षपदी राष्ट्रवादीचे चंद्रकांतदादा ठाकरे बिनविरोध

वाशिम, पुढारी वृत्तसेवा

ओबीसी आरक्षणावरून सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे, रिक्त झालेल्या वाशिम जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत आज दि . १ ९ नोव्हेंबर रोजी चंद्रकांत ठाकरे यांनी, निवडणूक अधिकाऱ्यांकडे अर्ज दाखल केला. त्यांच्याविरोधात कोणीही अर्ज दाखल न केल्याने चंद्रकांत ठाकरेंची वाशिम जिल्हा परिषद अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली.

अध्यक्षपदाच्या निवडणुकीत सर्वपक्षीय घडी बसविण्यात चंद्रकांत ठाकरे यशस्वी ठरले. तथापी पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे संख्याबळ वाढल्याने व काँग्रेस , शिवसेना , महाविकास आघाडीत वंचित व जनविकासचीही साथ मिळाल्याने भाजपनेही माघार घेतली.

वाशीम जिल्हा परिषदेची सदस्य संख्या एकूण ५२ असून, पोट निवडणूकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस १४, काँग्रेस ११, जनविकास ६, वंचित बहुजन आघाडीचे ६, शिवसेना ६, स्वाभिमानी शेतकरी संघटना १ तर अपक्ष १ असे पक्षीय बलाबल झाले आहे.

मात्र जि. प. अध्यक्षपदासाठी चंद्रकांत ठाकरे यांनी, अर्ज दाखल केल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली . या निवडणूकीनंतर चार विषय समितीच्या सभापती पदांपैकी रिक्त झालेल्या सभापती पदासाठी निवडणूक कार्यक्रमाकडे राजकीय क्षेत्राचे लक्ष लागून आहे.

दरम्यान , सभापती पदासाठी मोर्चेबांधणी सुरू असून, महत्त्वाच्या पदासाठी चढाओढ लागली आहे. त्यावेळी अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडीची युती झाल्याने सदर निवडणूक बिनविरोध झाली आहे.

हे ही वाचा :

Back to top button