Weather forecast | आणखी दोन दिवस पाऊस, त्यानंतर धुक्याची चादर | पुढारी

Weather forecast | आणखी दोन दिवस पाऊस, त्यानंतर धुक्याची चादर

पुढारी ऑनलाईन डेस्क : गेल्या दोन दिवसांपासून राज्यात अवकाळीने थैमान घातले आहे. मध्य महाराष्ट्रासह, उत्तर महराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात अवकाळी पाऊस सुरू आहे. दरम्यान, काही भागात गारपीटही मोठ्या प्रमाणात झाली आहे. आणखी दोन दिवस पावसाचे असून, त्यानंतर धुक्यांची निर्मिती होईल आणि थंडीला सुरूवात होणार आहे, असे हवामान विभागाने आज प्रसिद्ध केलेल्या बुलेटिनमध्ये ही माहिती दिली आहे. (Weather forecast)

हवामान विभागाने पुढे म्हटले आहे की, आज मंगळवारी २८ आणि २९ नोव्हेंबर रोजी मध्य महाराष्ट्रासह, मराठवाडा आणि विदर्भात विजांच्या कडकडाटांसह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. दरम्यान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये देखील आज आणि पावसाची शक्यता आहे. त्यानंतर वायव्य आणि मध्य भारतातील तापमान किमान तापमानात २ ते ३ अंश सेल्सिअसने घट होणार आहे. दरम्यान पुढील दोन दिवसानंतर सकाळच्या दरम्यान मध्यम स्वरूपाची धुके पसरण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. (Weather forecast)

Weather forecast : येत्या दोन दिवसात ‘या’ राज्यात थंडीची चाहूल

पुढील दोन दिवसांत उत्तर भारतातील उत्तराखंड, उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा, छत्तीसगड, दिल्ली, उत्तर राजस्थान तर ईशान्येकडील आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोरम आणि त्रिपुरा या राज्यात मध्यम स्वरूपाच्या धुक्यांची निर्मिती होण्याची शक्यता आहे, असेदेखील हवामान विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

हेही वाचा:

Back to top button