Weather Update : राज्यात आणखी दोन दिवस पाऊस; किमान तापमानात घट | पुढारी

Weather Update : राज्यात आणखी दोन दिवस पाऊस; किमान तापमानात घट

पुणे : पुढारी वृत्तसेवा : राज्यात गेल्या चोवीस तासांत बहुतांश भागांत गारपिटीसह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. दरम्यान, कोकणातला पाऊस कमी झाला असून, उर्वरित राज्यात मात्र अजून दोन दिवस मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. राज्याच्या किमान तापमानात घट होण्यास सुरुवात झाली आहे. गेल्या चोवीस तासांत देशातील बहुतांश भागांत पावसाने जोरदार हजेरी लावली.

उत्तर भारतात पश्चिमी चक्रवात सक्रिय झाल्याने जम्मू-काश्मीरपासून शीत लहरी येण्यास सुरुवात झाली आहे. राज्यात सर्वत्र रविवारपासून अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. अनेक भागांत गारपीट झाली. त्यामुळे तापमानात घट होऊन गारवा निर्माण झाला. हिवाळ्यात पावसाळी वातावरणाचा अनुभव मिळत आहे. राज्यात अजून दोन दिवस पावसाचा अंदाज असून, मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा भागात 28 व 29 रोजी यलो अलर्ट देण्यात आला आहे. मात्र, कोकणातला पाऊस कमी झाला आहे.

राज्याचे मंगळवारचे तापमान

वाशिम 14.8, पुणे 19.7, नगर 18.5, जळगाव 18, महाबळेश्वर 16.7, नाशिक 18.4, सातारा 19.9, सोलापूर 22.5, छत्रपती संभाजीनगर 17.8, परभणी 17.6, बीड 17.4, गोंदिया 15.3.

‘‘या’ भागात पावसाचा जास्त जोर राहणार…

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा अजूनही सक्रिय असल्याने मुंबई, पालघर, पुणे, रायगड, ठाणे, नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, नगर, बीड, परभणी, नागपूर, वर्धा, चंद्रपूर, वाशिम, यवतमाळ, अकोला, अमरावती, भंडारा या भागांत पाऊस राहील.

हेही वाचा

Dengue : डेंग्यूने वाढवली चिंता; प्लेटलेटसाठी धावाधाव

सिंधुदुर्ग : चिपी विमानतळावरील परतीचे विमान रद्द झाल्याने गोंधळ, मुंबईला जाणा-या प्रवाशांची गैरसोय

गडचिरोली : चित्तरंजनपूरमध्ये तिहेरी अपघातात दोघेजण ठार, तिघे जखमी

 

Back to top button