Pune News : जागतिक बँकेच्या कर्जावरून पालिकेचा ‘यू टर्न’ | पुढारी

Pune News : जागतिक बँकेच्या कर्जावरून पालिकेचा ‘यू टर्न’

पुणे : पुढारी वृत्तसेवा : समाविष्ट गावांमधील सांडपाण्याचे व्यवस्थापन करण्यासाठी जागतिक बँकेकडून कर्ज घेण्याचे नियोजन महापालिकेने केले होते. मात्र, या निर्णयावरून यू टर्न घेत महापालिका आता ठेवींवर कर्ज घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. महापालिकेने समाविष्ट गावांतील सांडपाणी व्यवस्थापनासाठी जागतिक बँकेकडून 530 कोटी रुपयांचे कर्ज घेण्याचे नियोजन केले आहे.

दुसरीकडे, महापालिकेच्या 2200 कोटी रुपयांच्या ठेवी 4 बँकांमध्ये आहेत, तर 755 कोटी रुपये शासकीय हमी योजनेमध्ये गुंतविलेले आहेत. असे असताना महापालिका 530 कोटी रुपयांचे कर्ज भरमसाट व्याजदराने का काढत आहे? असा सवाल करीत सामाजिक कार्यकर्त्यांनी बँकेतील ठेवींवर कर्ज घ्यावे, अशी मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर जागतिक बँकेकडून कर्ज घेण्यापेक्षा ठेवींवर कर्ज घेण्याचा विचार प्रशासनाकडून केला जात आहे.

हेही वाचा

Back to top button