Rashmika Mandanna : रश्मिका मंदाना डीपफेक व्हिडिओ प्रकरणी गुन्हा दाखल | पुढारी

Rashmika Mandanna : रश्मिका मंदाना डीपफेक व्हिडिओ प्रकरणी गुन्हा दाखल

पुढारी ऑनलाईन डेस्क : दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने साऊथ चित्रपट अभिनेत्री रश्मिका मंदानाच्या (Rashmika Mandanna) डीपफेक व्हिडिओ प्रकरणी केस दाखल केली आहे. दिल्ली सायबर क्राईम युनिट स्पेशल सेलच्या पोलिस उपायुक्त डॉ. हेमंत तिवारी यांनी सांगितले की, या प्रकरणाच्या तपासासाठी एक विशेष टीम स्थापन केली आहे. (Rashmika Mandanna) रिपोर्टमध्ये आयटी ॲक्टची कलमे लावण्यात आली आहे. याआधी दिल्ली महिला आयोगाने सिटी पोलिसांकडे १७ नोव्हेंबरपर्यंत या प्रकरणाची एफआयआर कॉपी, याप्रकरणी आरोपींचा तपशील आणि कारवाईचा अहवाल मागवला आहे.

संबंधित बातम्या –

अज्ञात लोकांविरोधात एफआयआर

सोशल मीडिया व्हायरल झालेल्या रश्मिकाच्या व्हिडिओनंतर आता दिल्ली पोलिसांनी शुक्रवारी अज्ञातांविरोधात एफआयआर दाखल केले आहे.

तपास सुरु

दिल्ली पोलिस स्पेशल सेलच्या इंटेलिजेन्स फ्यूजन अँड स्ट्रॅटेजिक ऑपरेशन्स युनिटमध्ये भारतीय दंड संहिता कलम ४६५ आणि ४६९ तसेच कलम ६६ सी व ६६ ई अंतर्गत एफआयआर दाखल केली होती. पोलिसांनी म्हटलं आहे की, त्यांनी टीम स्थापन करून तपास सुरू केला आहे. याआधी दिल्ली महिला आयोगाने व्हिडिओ प्रकरणी सिटी पोलिसांना नोटीस पाठवले आणि आरोपींविरोधात कारवाईची मागणी केली.

खऱ्या व्हिडिओमध्ये होती जारा पटेल

रश्मिका मंदानाच्या मॉर्फींग व्हिडिओ मागे रिअल तरुणी जारा पटेल होती, ती एक ब्रिटिश इंडियन इंफ्लुएन्सर आहे.

Back to top button