Sikandar Shaikh Maharashtra Kesari 2023 | वस्ताद विश्वास हारुगले वर्षभर घरी गेलेच नाहीत, घराच्या सुखांचा त्याग करुन साकारले सिकंदरचे स्वप्न | पुढारी

Sikandar Shaikh Maharashtra Kesari 2023 | वस्ताद विश्वास हारुगले वर्षभर घरी गेलेच नाहीत, घराच्या सुखांचा त्याग करुन साकारले सिकंदरचे स्वप्न

कोल्हापूर : गौरव डोंगरे : महाराष्ट्र केसरीच्या मागील स्पर्धेत सिकंदरचा दुर्दैवी पराभव वस्ताद विश्वास हारुगलेंच्या जिव्हारी लागला. राहत्या घराचा त्याग करून वस्ताद गंगावेस तालमीत राहायला आहेत. सिकंदरच्या मागील पराभवाचा वचपा काढायचा चंग वस्तादांनी बांधला. या निश्चयामुळे हारुगले यांची पत्नी रेखा, मुलगी इंद्रायणी, मुलगा धनंजय वडिलांसोबत गंगावेस तालीम येथे राहण्यास आले. वर्षभर घराकडे न जाता हारुगले तालमीत थांबून सिकंदरची तयारी करून घेतली. (Sikandar Shaikh Maharashtra Kesari 2023)

संबंधित बातम्या :

 ‘हिंदकेसरी’ दिनानाथसिंह यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेले वस्ताद विश्वास हारुगले करवीर तालुक्यातील कोगे गावचे. स्वत: 1997 साली महाराष्ट्र केसरी स्पर्धेत गटात सुवर्णपदक पटकावले. 1999 पासून गंगावेस तालमीत मुलांचा सराव घेण्यास त्यांनी सुरुवात केली. ते अवघ्या 10 वर्षांच्या मल्लापासून अनेकांचा सराव करून घेतात. त्यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेल्या माऊली जमदाडेने महाराष्ट्र केसरी स्पर्धेत उपांत्य फेरी गाठली होती. प्रकाश बनकरला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. तर योगेश बंबाळे महाराष्ट्र केसरी स्पर्धेत चौथ्या फेरीपर्यंत पोहोचला. मात्र, तालमीला महाराष्ट्र केसरी गदेने गेली काही वर्षे हुलकावणी दिली होती.

सिकंदरचा मागील पराभव वस्ताद विश्वास हारुगलेंनी मनाला लावून घेतला. मात्र, यानंतर हारुगडे सहकुटुंब गंगावेस तालमीतच तळ ठोकून ही तयारी करून घेत होते. पत्नी रेखा, मुलगी इंद्रायणी, मुलगा धनंजय यांनीही तालमीतील एका खोलीत राहून कोणतीही तक्रार न करता वडिलांचे स्वप्न साकार करण्यात साथ दिली.

हेही वाचा : 

 

Back to top button