बीड : प्रसिद्ध उद्योजक सुरेश कुटे यांचा भाजपा प्रवेश | पुढारी

बीड : प्रसिद्ध उद्योजक सुरेश कुटे यांचा भाजपा प्रवेश

बीड, पुढारी वृत्तसेवा : बीड जिल्ह्यातील प्रसिद्ध उद्योजक तथा ‘द कुटे ग्रुप’ चे सर्वेसर्वा सुरेश कुटे यांचा अखेर भाजपात प्रवेश झाला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत नागपूर येथे कुटे यांनी भाजपात प्रवेश केला. यावेळी अर्चना कुटे यांचीही उपस्थिती होती. कुटे यांच्या भाजपा प्रवेशने जिल्ह्यातील समीकरणे बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच कुटे यांच्या तिरूमला ग्रुप मधील काही कंपन्यांची आयकर विभागाने तपासणी केली होती. यानंतर हा प्रवेश झाल्याने याचीही चर्चा होत आहे.

हेही वाचलंत का?

Back to top button