Rohit- Shubman Record : सलामीवीर रोहित शर्मा-शुभमन गिलच्‍या नावावर नव्‍या विक्रमाची नोंद! | पुढारी

Rohit- Shubman Record : सलामीवीर रोहित शर्मा-शुभमन गिलच्‍या नावावर नव्‍या विक्रमाची नोंद!

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : एकदिवसीय (वन-डे ) क्रिकेट विश्‍वचषक स्‍पर्धेत आज (दि.५) भारताचा मुकाबला दक्षिण आफ्रिका संघाशी होत आहे. हा सामना कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर खेळवला जात आहे. टॉस जिंकत कर्णधार रोहित शर्माने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाचे सलामीवीर रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी झंझावाती सुरुवात केली. दोघांनी 35 चेंडूत 62 धावांची भागीदारी केली. या भागीदारीसह रोहित आणि शुभमनने भारतासाठी एक खास विक्रमही आपल्‍या नावावर केला आहे. ( Rohit- Shubman Record )

2023 या वर्षामध्‍ये आतापर्यंत भारताने वनडेमध्ये पहिल्या विकेटसाठी 2019 धावा केल्या आहेत. एका वर्षात भारताने सलामीच्या विकेटसाठी केलेल्या सर्वाधिक धावा आहेत. यापूर्वी १९९८ मध्ये भारताने एकदिवसीय सामन्यात पहिल्या विकेटसाठी 2002 धावा केल्या होत्या. तर 2002 मध्ये 1702 धावा झाल्या होत्या.

Rohit- Shubman Record : यंदाच्‍या विश्‍वचषक स्‍पर्धेत दुसर्‍या वेगवान ५० धावा

Rohit- Shubman Record

रोहित-शुभमनने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झंझावाती सुरुवात केली. भारताने अवघ्या ४.३ षटकात ५० धावा पूर्ण केल्या. या विश्वचषकात कोणत्याही संघाने सर्वात जलद 50 धावा पूर्ण करण्याचा हा दुसरा विक्रम आहे. धर्मशाला येथे न्यूझीलंडविरुद्ध ऑस्‍ट्रेलियाने ४.१ षटकात ५० धावा पूर्ण केल्‍या होत्‍या,. आजच्‍या सामन्‍यात रोहितने ६ चौकार आणि दोन षटकार फटकावत 24 चेंडूत 40 धावांची खेळी केली. त्याला कागिसो रबाडाने टेंबा बावुमाच्या हाती झेलबाद केले.

रोहित शर्माला सर्वाधिकवेळा बाद करण्‍याचा विक्रम रबाडाच्‍या नावावर

दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज रबाडा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये रोहित शर्मा याला सर्वाधिक वेळा बाद करणारा खेळाडू ठरला आहे. त्याने तिन्ही फॉरमॅटमध्‍ये (कसोटी, वन-डे आणि T-20 ) रोहितला तब्‍बल १२ वेळा बाद केले आहे.तर रोहितला सर्वाधिकवेळा बाद करण्‍यात टीम साऊदी (11 वेळा) दुसऱ्या स्थानावर आहे. तर अँजेलो मॅथ्यूज( १० वेळा) तिसऱ्या स्थानावर आहे. नॅथन लायनने रोहितला नऊ वेळा तर ट्रेंट बोल्टने रोहितला आठ वेळा बाद केले आहे.

पहिल्या पॉवरप्लेमध्ये यानसेनला एकही विकेट नाही

दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज मार्को जॅनसेन पहिल्या पॉवरप्लेमध्ये (पहिली १० षटके) एकही विकेट घेऊ शकला नाही. यानसेनला पहिल्या दहा षटकांत एकही विकेट घेता आली नसल्याची या विश्वचषकात ही पहिलीच वेळ आहे. त्‍याने या विश्वचषकात आतापर्यंत सात सामन्यांत 16 बळी घेतले आहेत.

हेही वाचा : 

 

Back to top button