ODI Cricket World Cup : पाक खेळाडूंसोबत गैरवर्तन! भारताकडून पराभवानंतर पाकिस्तानची ICC कडे तक्रार

ODI Cricket World Cup  : पाक खेळाडूंसोबत गैरवर्तन! भारताकडून पराभवानंतर पाकिस्तानची ICC कडे तक्रार
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत भारताने पाकिस्तानला पराभवाची धूळ चारली. टीम इंडियाचा हा शानदार विजय पाकिस्तानच्या पचनी पडलेला नाही. १४ ऑक्टोबर रोजी झालेल्या भारत- पाकिस्तान सामन्यादरम्यान पाक खेळाडूंना लक्ष्य करत प्रेक्षकांनी गैरवर्तन केल्याची तक्रार पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) आयसीसीकडे केली आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या क्रिकेट व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष झका अश्रफ हे भारतातून पाकिस्तानात परतले आहेत. व्हिसाच्या व्यतिरिक्त अहमदाबादमधील प्रेक्षकांच्या वागणुकीबाबतही पीसीबीने तक्रार केली आहे.

संबंधित बातम्या : 

एकदिवसीय विश्वचषक २०२३ भारतात आयोजित केला आहे. आतापर्यंत ही स्पर्धा सुपरहिट ठरली आहे. सुरूवातीपासूनच यजमान टीम इंडियाची दमदार कामगिरी राहीली आहे. या स्पर्धेत भारतासाठी सर्व काही चांगले चालले असल्याने पाकिस्तानला हे पचनी पडत नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार पीसीबीने आयसीसीकडे तक्रार केली आहे. बाबर आझम आणि त्याची टीम भारताविरुद्ध आयसीसी विश्वचषक जिंकण्यात अयशस्वी झाल्यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने पाकिस्तानी खेळाडूंसोबत प्रेक्षकांनी अयोग्य वर्तन केल्याची तक्रार दाखल केली आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या क्रिकेट व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष झका अश्रफ हेही भारतातून पाकिस्तानात परतले आहेत. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने पाकिस्तानी पत्रकारांना व्हिसा देण्यास होणारा विलंब आणि विश्वचषक २०२३ साठी पाकिस्तानी चाहत्यांसाठी व्हिसा धोरण नसल्याबद्दल आयसीसीकडे आणखी एक औपचारिक निषेध नोंदवला आहे.

झका अश्रफ सोमवारी पाकिस्तानला परतले आणि त्यांच्या भारत दौऱ्यावर चर्चा करण्यासाठी बोर्डाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत अनेक बैठका घेत आहेत. भारताविरुद्धच्या सामन्यासाठी झका अश्रफ स्वत: अहमदाबादमध्ये उपस्थित होते. सामन्यादरम्यानच्या काही घटनांवर त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. असे असूनही भारतीय क्रिकेट अधिकाऱ्यांनी भेटीनंतर त्यांचे जंगी स्वागत केले होते.

पाकिस्तानचे संघ संचालक आणि मुख्य प्रशिक्षक मिकी आर्थर यांनी पराभवानंतर भारताच्या प्रेक्षकांच्या वागणुकीबद्दल आणि त्यांच्या संघावर झालेल्या परिणामाबद्दल आयसीसीकडे तक्रार केली. आयसीसीचे अध्यक्ष ग्रेग बार्कले यांनी प्रतिक्रिया दिली की, खेळाची जागतिक प्रशासकीय संस्था विश्वचषक यशस्वी करण्यासाठी कठोर परिश्रम घेत आहे.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news