वाढत्या लोकसंख्यमुळे खेडमध्ये तीन आमदार होतील : आ. दिलीप मोहिते पाटील | पुढारी

वाढत्या लोकसंख्यमुळे खेडमध्ये तीन आमदार होतील : आ. दिलीप मोहिते पाटील

भामा आसखेड : पुढारी वृत्तसेवा : खेड तालुक्यातील एमआयडीसीमुळे चाकण व परिसरातील लगतची दोन-तीन गावे मिळून पाच लाखांपर्यंत लोकसंख्या झाली. वाढत असलेल्या सततच्या लोकसंख्येमुळे भविष्यात खेड तालुक्यात विधानसभेचे तीन मतदारसंघ होऊन तालुक्यात तीन आमदार होतील, असे प्रतिपादन आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी केले. जलजीवनमधून गावात पाणीपुरवठा योजना होत असताना दर्जेदार कामासाठी दक्ष राहून भविष्याच्या दृष्टीने योजना व्यवस्थित राबविणे हे ग्रामस्थांचे कर्तव्य आहे, असेही त्यांनी सांगितले. टाकळकारवाडी येथे जलजीवन पाणीपुरवठा योजना व विठ्ठल-रखुमाई मंदिर कामाचे भूमिपूजन व ग्रामपंचायत कामाचे उद्घाटनप्रसंगी झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.

संबंधित बातम्या :

या वेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष शरद बुट्टे पाटील, जि.प.चे माजी सदस्य बाबाजी काळे, कैलास टाकळकर, सरपंच सुजाता टाकळकर, उपसरपंच कारभारी टाकळकर, ग्रामपंचायत सदस्य राजाराम टाकळकर, शारदा टाकळकर, साधना टाकळकर, शीतल टाकळकर, सत्यभामा टाकळकर, सुशीला टाकळकर, माजी सरपंच राजेंद्र टाकळकर, परशुराम टाकळकर, बबन टाकळकर, सुभाष टाकळकर, ग्रामसेविका माधुरी गिरी आदी उपस्थित होते. शरद बुट्टे पाटील म्हणाले, शाश्वत विकासाची कामे गावात दिशादर्शी ठरतात. स्वच्छ पिण्याचे पाणी मिळाल्याने नागरिकांना आरोग्याच्या समस्या उद्भवत नाहीत. गावात झालेल्या योजनांची देखभाल व दुरुस्ती वेळेत झाल्यास योजना दीर्घकाळ टिकेल.या वेळी बाबाजी काळे यांचे भाषण झाले. प्रास्ताविक गीताराम टाकळकर यांनी केले. सूत्रसंचालन कैलास टाकळकर यांनी केले. आभार कारभारी टाकळकर यांनी मानले.

Back to top button