आता घरी बसणार नाही, तुम्हाला मैदानात दिसेल : पंकजा मुंडे | पुढारी

आता घरी बसणार नाही, तुम्हाला मैदानात दिसेल : पंकजा मुंडे

बीड, पुढारी वृत्तसेवा :  माझ्यावर थोडे संकट आले तर तुम्ही दोन दिवसात 11 कोटी रूपयांचे चेक दिले. शिवशक्ती परिक्रमेच्या माध्यमातून राज्याच्या विविध भागात गेले. लोकांनी जेसीबीतून फुले उधळली. माझी परिक्रमा आणि तुमच्या शक्तीची ज्योत जेव्हा एकत्र येईल तेव्हा ईतिहास घडल्याशिवाय राहणार नाही, असे सांगत भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी भगवान भक्ती गडावरून त्यांच्या विरोधकांना ईशारा दिला. आता मी घरात बसणार नाही, तर मैदानात उतरणार आहे. यावेळी हजारोंच्या संख्येने उपस्थितीतांनी टाळयांच्या कडकडाटात पंकजा मुंडे यांच्या वक्तव्याचे स्वागत केले.

पुढे बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या, राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यातून, प्रत्येक गावातून तुम्ही ईथे आला आहात. तुमच्यापुढे नतमस्तक होते. ईथे येजाना जागोजाग विविध जातीधर्माच्या लोकांनी माझे स्वागत केले. का आलात तुम्ही? मला कुठले पद, खुर्ची मिळाली म्हणून आलात का? कुठलेही पद नसताना तुम्ही येता हे प्रेम आहे. राजकारण मी करावे, का सोडून द्यावे? शिवपरिक्रमा जेव्हा केली तेव्हा एवढे प्रेम मिळेल असे वाटले नव्हते. मात्र लोकांनी माझी परिक्रमा भव्य- दिव्य केली.

कारखान्यावर रेड झाली तेव्हा दोन दिवसात 11 कोटीचे चेक तुम्ही मला दिले. तुम्ही नेहमी उनात बसता म्हणून मी देखील आज उनात स्टेज केले, असे सांगत शेतकर्यांना विमा, अनुदान मिळाले का? सामान्य माणसाला न्याय मिळत आहे का? असा थेट सवा त्यांनी केला. माझा आवाज दाबण्याचा नेमही प्रयत्न होतो. परंतू माझा आवाज आता कोणी दाबू शकणार नाही. लोक मला नेता, नेतृत्व, ताई अन् ताईसाहेब म्हणतात. परंतू मी आता ताईसाहेब नव्हे तर तुमची आई आहे, असे सांगत पंकजा मुंडे यांनी भगवान भक्ती गड येथून आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. यावेळी हजारो, लाखो उपस्थितीतांनी त्यांना टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली.

प्रत्येकवेळी तुमचा अपेक्षाभंग

विधान परिषद अथवा ईतर अनेक संधीच्या वेळी तुम्हाला वाटते ताईंना संधी मिळेल. परंतू दरवेळी तुम्ही आशा लावता अन् तुमचा अपेक्षाभंग होतो. याबद्दल तुमची क्षमा मागते. गोपीनाथ मुंडे यांची लेक म्हणून असलेली हिम्मत माझ्यात आहे. लोक चर्चा करतात पंकजा या पक्षात जाणार, त्या पक्षात जाणार, परंतू पंकजा मुंडे हीची निष्ठा एवढी लेचीपेची नाही. ब्रम्ह, विष्णू, महेश अन् देवीलाही संघर्ष करावा लागला. भगवान बाबा अन् श्रीकृष्ण यांनाही स्थलांतरीत व्हावे लागले, असे सांगत पंकजा मुंडे यांनी सुचक शब्दातून ईशारा दिला. मी आता माझ्या मालकीची नाही, समर्थकांच्या मालकीची आहे, असे सांगत त्यांनी सुचक वक्तव्य केले.

लाज वाटेल असे कृत्य केले नाही

न जाने मुझे कैसे परखता है मेरा उपरवाला.. इम्तेहान सख्त लेता है मगर हारने नहीं देता है.. असा शेर म्हणत निवडणुकीत जरी हरले तरी तुमच्या नजरेतून कधीही उतरले नाही. कोणाला लाज वाटेल, कोणाला वाईट वाटेल असे कृत्य मी केले नाही. यापुढेही राजकारण आणि समाजकारणात माझ्याकडून चुकीच काम होणार नाही, असे पंकजा मुंडे म्हणाल्या.

निधी देताना जात, धर्म अन् पक्ष पाहिला नाही : पंकजा मुंडे

राज्याची ग्रामविकास मंत्री असताना निधी देताना कोणत्या गावात कोण रहाते? कोणत्या गावात कोणत्या समाजाची किती लोकसंख्या? तिथे आपले मतदार किती हे मी कधीही पाहीले नाही. जो मागणी अन् प्रस्ताव घेऊन येईल त्याला कोट्यावधी रूपयांचा निधी दिला. कधीच मनाने खचले नाही परंतू, तुमच्या सेवेत खंड पडला ही खंत, आहे, असे पंकजा मुंडे म्हणाल्या.

Back to top button