चंद्रपूर : तुलाना येथे चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा निर्घृण खून; पतीला अटक

चंद्रपूर : तुलाना येथे चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा निर्घृण खून; पतीला अटक

चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : चारित्र्याच्या संशयावरून व्यसनाधिन पतीने धारदार शस्त्राने पत्नीवर वार करून तिचा खून केल्याची घटना रविवारी (दि.२६) उघडकीस आली. ही घटना राजुरा तालुक्यातील तुलाणा गावात सकाळी आकराच्या सुमारास घडली. तुळजाबाई अनिल सेलूरकर असे या मृत महिलेचे नाव आहे. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे. घटनेनंतर पती अनिल सेलूरकर हा स्वत : पोलीस ठाण्यात हजर झाला.

राजूरा तालुक्यातील तुलाणा येथील अनिल सेलूरकर हा टेलरिंग व्यवसाय करतो. दारुच्या व्यसनाच्या आहारी गेलेला अनिल आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घ्यायचा. त्यामुळे दोघांत नेहमी भांडणे व्हायची. रविवारी सकाळी तुळजाबाई ही महिला गावातील काही महिलांसोबत तेंदूपत्ता तोडण्यासाठी जंगलात गेली होती. तेंदूपत्ता घेऊन घरी येत असताना संशयखोर अनिलने गावाशेजारी तिला गाठले. व तिच्यावर धारदार शस्राने हल्ला केला. या हल्ल्यात तिचा जागीच मृत्यू झाला. यावेळी गावातील एक महिला तिच्यासोबत होती. त्यानंतर पतीने त्या महिलेलाही मारण्याचा प्रयत्न केला, मात्र ती गावात पळत सुटल्याने तिचा जीव वाचला. हा सर्व प्रकार तिने गावात सांगितला. गावक-यांनी लगेच विरुर पोलिस ठाण्यात घटनेची माहिती दिली. त्यानंतर संशयित आरोपी अनिल सेलूरकर हा स्वत : पोलीस ठाण्यात हजर झाला. पोलिसांनी त्याला अटक करत त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी ठाणेदार संतोष वाकडे, स्थानिक गुन्हे शाखेचे गायकवाड हे तपास करत आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news