Pune Metro News : मेट्रोचा खर्च सव्वादोन हजार कोटींनी वाढला | पुढारी

Pune Metro News : मेट्रोचा खर्च सव्वादोन हजार कोटींनी वाढला

पुणे : इस्रायल आणि पॅलेस्टाईनमधील हमास संघटनेमध्ये युद्ध सुरू आहे. त्यामुळे या देशांमध्ये राहत असलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी केंद्र सरकारने ‘ऑपरेशन अजय’ सुरू केले आहे. आतापर्यंत इस्रायलमध्ये जवळपास 20 हजारांहून अधिक भारतीय नागरिक असून, ते सुखरूप आहेत. आतापर्यंत त्यातील एक हजार 200 नागरिकांना भारतीय दूतावासाच्या मदतीने भारतात आणण्यात आले आहे, अशी माहिती केंद्रीय परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन यांनी दिली.

पुणे जिल्ह्यात दिशा समितीची बैठक झाल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत व्ही. मुरलीधरन बोलत होते. मुरलीधरन म्हणाले, ‘इस्रायल आणि पॅलेस्टाईन संघटनेतील संघर्ष थांबायचे नाव घेत नाही. दोघांमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या पातळीवर शांततेसाठी प्रयत्न होत आहेत. मात्र, यामध्ये कोणीही माघार घेण्यास तयार नाही. गाझा पट्टीवरून इस्रायलवरदेखील हल्ले केले जात आहेत. या ठिकाणी जवळपास 20 हजारांहून अधिक भारतीय नागरिक वास्तव्यास असल्याची नोंद झाली आहे. अद्याप त्यांना कुठलाही धोका नसून सर्व नागरिक सुरक्षित आहेत. युद्ध सुरू होताच पहिल्या दिवसापासून भारतीय दूतावास इस्रायल देशात तळ ठोकून आहे.

हेही वाचा

Sassoon Drug racket case : दर्जेदार मेफेड्रॉन बनविण्यात शिंदे, पंडित एक्स्पर्ट

Nashik Crime : न्यायडोंगरी पुन्हा हादरलं, दगडाने ठेचून एकाची हत्या

Pune Crime News : पुण्यात जुगार अड्डा लुटला गुन्हेगारांनी ! सीसीटीव्ही फुटेज व्हायरल

Back to top button