India-Canada Row : कॅनडाच्‍या पंतप्रधानांचा निज्‍जर हत्‍या प्रकरणी नवीन दावा, म्‍हणाले… | पुढारी

India-Canada Row : कॅनडाच्‍या पंतप्रधानांचा निज्‍जर हत्‍या प्रकरणी नवीन दावा, म्‍हणाले...

पुढारी ऑनलाईनड डेस्‍क : कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी आता खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जर याच्‍या हत्‍येप्रकरणी नवा दावा केला आहे. यापूर्वी त्‍यांनी निज्‍जर हत्‍या प्रकरणी कोणतेही पुरावे न देता कॅनडाचे पंतप्रधान या हत्येशी भारताचा संबंध जोडला होता. त्‍यांनी पुन्‍हा एकदा असाच प्रयत्‍न केला आहे. ( India-Canada Row )

ओटावा येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना ट्रुडो म्‍हणाले की, खलिस्तानी दहशतवाद्याच्या हत्येमागे भारतीयाचा सहभाग असल्याचा पुरावा कॅनडाने काही आठवड्यांपूर्वीच नवी दिल्लीतील यंत्रणेला दिला होता. आम्ही काही आठवड्यांपूर्वी भारतासोबत गुप्तचर माहिती शेअर केली होती. आम्हाला भारतासोबत सकारात्‍मक विचााराने सहकार्य ठेवायचे आहे. आम्हाला आशा आहे की ते आम्हाला सहकार्य करतील. या अत्यंत गंभीर प्रकरणाच्‍या पाळेमुळे शोधण्‍यास त्‍याचेही सहकार्य लाभेल, असेही त्‍यांनी सांगितले.

पंतप्रधान ट्रुडो यांनी १८ सप्‍टेंबर रोजी कॅनडाच्या संसदेला संबोधित करताना, निज्जरच्या हत्येमध्ये भारत सरकारचा सहभाग असल्‍याचा गंभीर आरोप कोणतेही पुरावे सादर न करता केला होता. भारताने हे आरोप फेटाळून लावले असून, ते निराधार आणि राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे स्‍पष्‍ट केले होते.

कॅनडाकडून कोणतीही विशिष्ट माहिती प्राप्त झाली नाही

भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी गुरुवारी म्‍हटले होते की, आम्ही कॅनडाकडून देण्‍यात आलेल्‍या माहितीवर लक्ष देण्यास तयार आहोत; परंतु अद्याप आम्हाला कॅनडाकडून कोणतीही विशिष्ट माहिती मिळालेली नाही.कॅनडामध्ये राहणार्‍या काही लोकांच्या गुन्हेगारी कृत्यांबाबतचे विशिष्ट पुरावे कॅनडासोबत शेअर केले गेले असले तरी त्यांच्यावर कारवाई करण्यात आली नाही, असेही त्‍यांनी म्‍हटले होते.

हेही वाचा : 

 

 

Back to top button