कॅनडात 13 दहशतवादी फिरतायत मोकाट! | पुढारी

कॅनडात 13 दहशतवादी फिरतायत मोकाट!

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : कॅनडातील खलिस्तानवादी आणि शीख दहशतवाद्यांच्या प्रत्यार्पणासाठी भारताने कॅनडाकडे गेल्या पाच वर्षांत 26 वेळा पाठपुरावा केला आहे. जस्टीन यांनी मात्र भारताच्या मागणीला कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद दिलेला नाही.

संदीप सिंह ऊर्फ सनी याच्यासह 13 दहशतवादी कॅनडात मोकाट फिरत आहेत. सुख्का देन्नेके याचाही प्रत्यार्पणाच्या प्रस्तावात समावेश होता. सुख्का याची बुधवारी हत्या झाली आहे. कॅनडातील खलिस्तान वाद्यांविरोधातील कारवायामध्ये भारतीय गुप्तचर यंत्रणाचा हात असल्याबाबत जस्टीन यांच्याकडे कोणत्याही प्रकारचे पुरावे नाहीत. निज्जर आणि सुख्का यांची गँगवारमधूनच हत्या झाली असल्याचा दावा भारताने केला आहे.

Back to top button