Canada India Tension | जस्टिन ट्रूडो पडले तोंडघशी! निज्जरच्या हत्येप्रकरणी पुरावे देण्यात अपयश | पुढारी

Canada India Tension | जस्टिन ट्रूडो पडले तोंडघशी! निज्जरच्या हत्येप्रकरणी पुरावे देण्यात अपयश

ओटावा (कॅनडा), पुढारी ऑनलाईन : खलिस्तान दहशतवादी हरदीप सिंग निज्जर याच्या हत्येवरुन भारत आणि कॅनडामधील संबंधात तणाव निर्माण झाला आहे. दरम्यान, कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो (Canada PM Justin Trudeau)  हे हरदीप निज्जरच्या हत्यमागे भारताचा हात असल्याच्या आरोपांना पुष्टी देण्यासाठी कोणतेही पुरावे देऊ शकलेले नाहीत. असे असतानाही कॅनडातील न्यूज प्लॅटफॉर्म सीबीसी (कॅनडियन ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन) ने दावा केला आहे की कॅनडाने या हत्या प्रकरणाच्या तपासात मानवी आणि सिग्नल्स इंटेलिजन्सची माहिती गोळा आहे. (Canada India Tension)

संबंधित बातम्या

सीबीसीने सूत्रांचा हवाला देऊन दावा केला आहे की कॅनडाच्या सरकारने गोळा केलेल्या गुप्त माहितीमध्ये देशातील भारतीय राजदूतांसोबत झालेल्या संभाषणांचा समावेश आहे. त्यात पुढे असाही दावा करण्यात आला आहे की या प्रकरणी काही भारतीय अधिकार्‍यांनी खासगी गुप्तचरांचा सहभाग असल्याची बाब नाकारलेली नाही. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंग निज्जरच्या हत्येमागे भारताचा सहभाग असल्याचा आरोप केल्यानंतर ही माहिती समोर आली आहे. दरम्यान, भारताने असे आरोप म्हणजे ‘मुर्खपणा’ असल्याचे सांगत त्याला चोख प्रत्युत्तर दिले होते. (India Canada tensions reason)

गुरुवारी न्यूयॉर्कमधील पत्रकार परिषदेत कॅनडाचे पंतप्रधान मात्र कॅनडाने केलेल्या दाव्यांची पुष्टी करण्यासाठी कोणतेही पुरावे सादर करण्यात अयशस्वी ठरले. ट्रूडो यांना कॅनडाने केलेल्या आरोपांबद्दल पुन्हा पुन्हा विचारले गेले. पण निज्जरच्या हत्येमागे भारताचा हात असल्याचे विश्वासार्ह कारणे ते देऊ शकले नाहीत.

“कॅनडात झालेल्या एका कॅनेडियनच्या हत्येत भारत सरकारच्या एजंटाचा हात असल्याची विश्वासार्ह माहिती आहे. ती म्हणजे …जिथे आंतरराष्ट्रीय नियमांवर आधारित सुव्यवस्था महत्त्वाची आहे अशा देशाच्या कायद्याच्या नियमात काहीतरी अत्यंत मूलभूत महत्त्व आहे” असे ट्रूडो म्हणाले.

“आम्ही भारत सरकारला हे प्रकरण गांभीर्याने घेण्याचे आवाहन करतो आणि या प्रकरणात संपूर्ण पारदर्शकता आणण्यासाठी आणि जबाबदारी आणि न्याय सुनिश्चित करण्यासाठी आम्हाला सहकार्य करावे,” असेही ट्रूडो यांनी नमूद केले. (why India Canada tension)

सीबीसी न्यूजनुसार, कॅनडाच्या सरकारने निज्जरशी मृत्यूशी संबंधित महिनाभर चाललेल्या तपासात मानवी आणि सिग्नल्स इंटेलिजन्सची माहिती गोळा केली आहे. त्या गुप्त माहितीमध्ये कॅनडामधील भारतीय राजदूतांच्या संभाषणाचा समावेश आहे.

गुप्तचर केवळ कॅनडातील नव्हते आणि काही फाईव्ह आयज इंटेलिजेन्स अलायन्स (अमेरिका, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि कॅनडा) मधील अज्ञात सहकाऱ्यांनी माहिती पुरवली होती. या प्रकरणाच्या संदर्भात हरदीप सिंग निज्जरच्या मृत्यूच्या तपासात सहकार्य मागण्यासाठी अनेक कॅनडाचे अधिकारी भारतात गेले आहेत. (Canada India issue)

कॅनडाचे राष्ट्रीय सुरक्षा आणि गुप्तचर सल्लागार जोडी थॉमस ऑगस्टच्या मध्यावधीला चार दिवस भारतात होते. त्यानंतर या महिन्यात पुन्हा पाच दिवस ते भारतात होते, असे सीबीसी न्यूजने वृत्तात म्हटले आहे.

कॅनडाने कोणतीही माहिती शेअर केली नाही

परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवारी सांगितले की, निज्जरच्या हत्येबाबत कॅनडाने कोणतीही माहिती शेअर केलेली नाही. “आम्हाला पुरवण्यात आलेली कोणतीही विशिष्ट माहिती आम्ही पाहण्यास तयार आहोत. पण आतापर्यंत आम्हाला कॅनडाकडून कोणतीही विशिष्ट माहिती मिळालेली नाही,” असे भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी पत्रकार परिषदेत संबोधित करताना स्पष्ट केले आहे.

“कॅनडातील व्यक्तीने त्यांच्या भूमीवर वैयक्तिकरित्या केलेल्या गुन्हेगारी कारवायांचे विशिष्ट पुरावे कॅनडाला देण्यात आले आहेत. पण त्यावर कारवाई केली गेली नाही. होय, मला वाटते की येथे काही प्रमाणात पूर्वग्रह आहे. त्यांनी आरोप केले आहेत आणि त्यांच्यावर कारवाई केली आहे. आम्हाला असे दिसते की कॅनडा सरकारचे हे आरोप प्रामुख्याने राजकीयदृष्ट्या प्रेरित आहेत,” असे बागची यांनी पुढे म्हटले.

भारतातील वाँटेड दहशतवादी हरदीप सिंग निज्जरची (hardeep singh nijjar death) १८ जून रोजी ब्रिटिश कोलंबियातील सर्रे येथील गुरुद्वाराबाहेर गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. यावरुन भारत आणि कॅनडा देशातील द्विपक्षीय संबंध बिघडले आहेत.

हे ही वाचा :

Back to top button