रायगड : महिलेच्या पर्समधील ४ लाख २८ हजाराच्या दागिन्यांची चोरी; अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा | पुढारी

रायगड : महिलेच्या पर्समधील ४ लाख २८ हजाराच्या दागिन्यांची चोरी; अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा

महाड, पुढारी वृत्तसेवा : माणगांव येथे आपल्या गावी गणेशोत्सवासाठी सहकार्‍या सोबत दुचाकीवरून जात असलेल्या महिलेची पर्स  दोघांनी लंपास केली आहे. दोघा अज्ञात इसमांनी पर्स खेचून नेत त्यातील ४ लाख २८ हजाराच्या दागिन्यांची चोरी केली आहे. हा प्रकार मुंबई गोवा महामार्गावर केंबुर्ली गावचे हद्दीत घडला. याबाबत अज्ञात व्यक्तींविरोधात महाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत महाड शहर पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, मुंबई-गोवा महामार्गावरिल मौजे केंबुर्ली गावच्या हद्दीतून मृणाली अनिल जंगम ही महिला दुचाकीवरुन जात होती. गोवा-मुंबई  रोडने स्कुटी वरुन जात असताना दुपारी 13.30 वा चे सुमारास केंबुर्ली गावाच्या हददीत आलेवेळी काळया रंगाच्या मोटार सायकल वरुन दोन इसम येवुन मोटार सायकलवर पाठीमागे बसलेल्या इसमाने मृणाली याचे हातातील शेवाळी रंगाची पर्स लंपास केली.

हेही वाचलंत का?

Back to top button