SSC Results Latur: राज्यात दहावीच्या निकालात लातूरचा दबदबा कायम | पुढारी

SSC Results Latur: राज्यात दहावीच्या निकालात लातूरचा दबदबा कायम

लातूर, पुढारी वृतसेवा : माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत लातूर विभागाने (SSC Results Latur)  याही वर्षी लक्ष वेधले आहे. राज्यात शंभर पैकी शंभर गुण मिळवणाऱ्या १८३ पैकी सर्वाधिक १२३ विद्यार्थी लातूर मंडळाचे आहेत. लातूर विभागाचा निकाल ९५.२७ टक्के लागला असून यात ९६.४६ मि‌ळवत लातूर जिल्ह्याने आघाडी मिळवली आहे. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी निकालात दोन टक्के वाढ झाली आहे. राज्याच्या निकालात लातूर विभाग सातव्या स्थानावर आहे.

 राज्यात दहावीच्या निकालात लातूरची वैशिष्टे काय?

  • राज्यात शंभर पैकी शंभर गुण मिळवणाऱ्या १८३ पैकी सर्वाधिक १२३ विद्यार्थी लातूर मंडळाचे
  • लातूर विभागाचा निकाल ९५.२७ टक्के
  • ९६.४६ मि‌ळवत लातूर जिल्ह्याने आघाडी मिळवली
  • गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी निकालात दोन टक्के वाढ

विभागात १ लाख ५ हजार ७८९ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी १ लाख ४ हजार ५०३ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. ९९ हजार ५७० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. विभागात लातूरने जिल्ह्याने बाजी मारली असून लातूर जिल्ह्याचा निकाल ९६.४६ टक्के लागला आहे. लातूर जिल्ह्यात परीक्षेसाठी ३८ हजार ४९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. पैकी ३७ हजार ६६५ नी परीक्षा दिली ३६ हजार ३३५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. धाराशिव जिल्ह्याचा निकाल ९५.८८ लागला आहे. या जिल्ह्यात परीक्षेसाठी २२ हजार १२४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. पैकी २१ हजार ७६९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली २० हजार ८७३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. नांदेड जिल्ह्याने ९३.९९ अशी टक्केवारी मिळवली आहे. या जिल्ह्यात ४५ हजार ६१६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. पैकी ४५ हजार ६०९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली ४२ हजार ३६२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

SSC Results Latur : उत्तीर्णतेत मुलींचीच आघाडी

विभागात मुला-मुलीच्या उत्तीर्णतेची टक्केवारी पहाता याही वर्षी मुलींचीच गाडी सुसाट आहे. विभागात मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ९६.९३ असे असून मुलांचे ९३.८८ टक्के आहे. जिल्ह्याच्या निकालातही मुलींचेच प्राबल्य आहे. लातूर जिल्ह्यात मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ९७.७३ असून मुलांचे ९५.४६ ट्क्के आहे. धाराशिव जिल्ह्यात मुलींची उत्तीर्णता ९७.५५ असून मुलांची ९४.४६ आहे. नांदेड जिल्ह्यात मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ६९.२० असून मुलांची ५८.२९ अशी आहे.

हेही वाचा 

Back to top button