माजी आमदार शरद सोनवणेंचा जुन्नर तहसीलदार कार्यालयावर मोर्चा | पुढारी

माजी आमदार शरद सोनवणेंचा जुन्नर तहसीलदार कार्यालयावर मोर्चा

नारायणगाव : पुढारी वृत्तसेवा : जुन्नर तालुक्यात बिबट्याची वाढणारी संख्या शेतकऱ्यांच्या मुळावर उठली असून दररोज कुठे ना कुठे बिबट्याचा हल्ला होताना पाहायला मिळतोय. बिबट्यांचा तात्काळ बंदोबस्त करावा आणि वनविभागाचे उप वनसंरक्षक अमोल सातपुते यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे, या मागणीसाठी जुन्नर तहसील कचेरीवर जुन्नरचे माजी आमदार शरद सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी (दि. २७) मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये धनगर बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. विशेष म्हणजे बांधवांनी या मोर्चामध्ये मेंढरं सहभागी करून घेतली होती.

सोमवारी सकाळी ११ वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालून मोर्चाला सुरवात करण्यात आली. जुन्नर शहरामधून मोर्चाची फेरी काढण्यात आली. या मोर्चामध्ये शेतकरी संघटना सहभागी झाली होती. संघटनेचे युवा आघाडीचे जुन्नर तालुकाध्यक्ष सचिन थोरवे, शेतकरी संघटनेचे नेते अंबादास हांडे उपस्थित होते. विविध मागण्यांचे फलक हातात घेण्यात आले होते. दरम्यान जुन्नरचे माजी आमदार शरद सोनवणे गेल्या चार दिवसापासून आळेफाटा येथे उपोषणाला बसले आहेत. ते स्वतः जुन्नरच्या मोर्चात पायी सहभागी झाले होते.

हेही वाचा

Back to top button