Jalgaon News | जिल्ह्यातील 1754 हेक्टर केळी, लिंबू पिकाचे नुकसान

Jalgaon News | जिल्ह्यातील 1754 हेक्टर केळी, लिंबू पिकाचे नुकसान

जळगाव : पुढारी वृत्तसेवा – जळगाव जिल्ह्यात रविवार (दि.२६) रोजी झालेल्या वादळी वाऱ्यामुळे जिल्ह्यातील 1754 हेक्टर केळी, लिंबू पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर 1730 शेतकरी बाधित झाले असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी दिली आहे.

जळगाव जिल्ह्यात रविवार (दि.२६) रोजी सायंकाळी जोरदार अवकाळी पावसाचा तडाखा बसला. यामध्ये जळगाव जिल्ह्यातील जामनेर, रावेर, यावल, मुक्ताईनगर, जळगाव या तालुक्यातील शेतकऱ्यांचे केळी, पपई या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

  • जामनेरमध्ये दहा गावे बाधित असून यामध्ये 175 शेतकऱ्यांचे 4 हेक्टरवरील केळी, तीन हेक्टरवरील पपई असे एकूण 7 हेक्‍टरवरील नुकसान झाले आहे.
  • रावेरमध्ये 24 गावे बाधित असून यामध्ये  643 शेतककऱ्यांचे ५६५.१० हेक्टर वरील केळी पिकाचे नुकसान झाले आहे
  • यावल गावांमधील 223 शेतकऱ्यांचे 127.50 हेक्टर वरील केळी पिकांचे नुकसान झाले आहेत.
  • मुक्ताईनगर तालुक्यातील सहा गावांमधील 678 शेतकऱ्यांचे १००० हेक्टर वरील केळी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मुक्ताईनगर तालुक्यात केळीचे पिके वादळी वाऱ्यामुळे उन्मळून पडलेली आहेत.
  • जळगाव तालुक्यातील तीन गावांमधील अकरा शेतकऱ्यांचे पाच हेक्टर वरील केळी पिकाचे नुकसान झालेले आहे. असे एकूण जळगाव जिल्ह्यातील पाच तालुक्यांमध्ये 59 गावांमधील १७३० शेतकऱ्यांचे 1754.60 हेक्टर वरील पिकांचे नुकसान झालेले आहे.

यावल तालुक्यातील वाघेरी ते लंगडा आंबा रोडवरील आंबापाणी या गावामध्ये वादळी वाऱ्यामुळे एक घर पडले असून त्यामध्ये चार जणांचा मृत्यू झालेला आहे. बोदवड तालुक्यात दोन गाय, दोन बैल, दोन म्हैस मृत्युमुखी पडले. यावल, जामनेर, बोदवड, रावेर, मुक्ताईनगर, जळगाव या तालुक्यांमध्ये एक हजार चारशे सात घरांची पडझड झालेली आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news