मोशी बंधार्‍याची सुरक्षा ऐरणीवर | पुढारी

मोशी बंधार्‍याची सुरक्षा ऐरणीवर

मोशी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : विविध दुर्घटना आणि अनेकांना जीव गमवाव्या लागलेल्या मोशी येथील इंद्रायणी नदी पुलावर वर्षाविहाराचा आनंद लुटण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे. मात्र, बंधार्‍यावर सुरक्षा व्यवस्था नसल्यामुळे पर्यटकांचा जीव धोक्यात आला आहे.

प्रशासनाचे दुर्लक्ष

काही दिवसांपासून नदीची पाणी पातळीत वाढ होत असताना अनेक पालक आपल्या मुलांना बंधार्‍याच्या भिंतीवर नेऊन खाली जुकवत असल्याचे चित्र दिसून आहे. याच बंधार्‍यावरून पडून अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. दोन वर्षांपूर्वी याच बंधार्‍यालगत गणेश मूर्तीचे विजर्सन करताना वडील व मुलाला जलसमाधी मिळाली होती, अशी अनेक दुर्घटना या बंधार्‍याचा भागात घडल्या असताना पालक सुधारत का नाहीत असा सवाल सुज्ञ नागरिक उपस्थित करत आहेत. बंधार्‍यावर चिमुकल्यांचा कल्ला अन सुरक्षेकडे मात्र दुर्लक्ष अशी स्थिती आहे. याकडे संबंधित प्रशासन, पोलिस यंत्रणादेखील दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येते. त्यामुळे पर्यटकांनी उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

बंधार्‍यावर सुरक्षा कठडे उभारण्याची मागणी

या बंधार्‍यावर सुरक्षा कठडे उभारले जावेत, अशी मागणी सातत्याने होताना दिसून येत आहे. मध्यंतरी याबाबत पालिकेने ठरावदेखील केला होता. मात्र, त्यापुढे काही सूत्रे हलली नाहीत. या बंधार्‍याचा वापर मोठ्या प्रमाणात चिंबळी बटवालवस्ती भागातील नागरिक मोशी येथे येण्यासाठी करतात. पावसाळ्यात पूर वाढल्यावर तो मार्गच बंद होतो. या भागात एक समांतर पूल झाल्यास त्याचा उत्कृष्ट लाभ येथील नागरिकांना होऊ शकतो. मात्र. त्यात अनेक तांत्रिक व प्रशासकीय मान्यतांची अडचणी आहेत. तुर्तास तरी येथील अतीउत्साही आणि हौशी पर्यटकांना आवरणे,पालकांना सावरणे गरजेचे आहे; अन्यथा मोठी दुर्घटना घडण्याचीच शक्यता अधिक आहे.

हेही वाचा

गडचिरोली: नक्षल्यांचा शहीद सप्ताह; पोलिसांनी तोडले नक्षली बिटलूचे स्मारक

आम्ही रिल्सकरी; उपनगरातील उद्यानांची तरुणाईला भुरळ  

संभाजी भिडेंना तत्काळ अटक करा अन्यथा काँग्रेस रस्त्यावर उतरेल; आ. कुणाल पाटील यांचा इशारा

Back to top button