गडचिरोली: नक्षल्यांचा शहीद सप्ताह; पोलिसांनी तोडले नक्षली बिटलूचे स्मारक | पुढारी

गडचिरोली: नक्षल्यांचा शहीद सप्ताह; पोलिसांनी तोडले नक्षली बिटलूचे स्मारक

गडचिरोली, पुढारी वृत्तसेवा: नक्षल्यांचा शहीद सप्ताह सुरु झाल्याच्या पहिल्याच दिवशी पोलिसांनी मृत नक्षली बिटलू मडावी याचे स्मारक उद्ध्वस्त करुन नक्षल्यांना चोख प्रत्युत्तर दिले आहे.

नक्षल्यांचे संस्थापक नेते चारु मुजुमदार यांच्या स्मृतीदिनानिमित्त नक्षली २८ जुलै ते ३ ऑगस्ट या कालावधीत शहीद सप्ताह साजरा करतात. या काळात ते चकमकीत आणि अन्य कारणांनी मृत झालेल्या नक्षल्यांना श्रद्धांजली अर्पण करतात. काही ठिकाणी ते स्मारकेही उभारतात. जहाल नक्षली बिटलू मडावी याचे एक स्मारक भामरागड तालुक्यातील विसामुंडी येथे नक्षल्यांनी उभारले होते. पोलिसांनी ते उखडून फेकले.

बिटलू मडावी याची भामरागड आणि एटापल्ली तालुक्यात दहशत होती. ३० एप्रिल २०२३ रोजी भामरागड तालुक्यातील केडमारा येथील जंगलात पोलिसांशी झालेल्या चकमकीत बिटलू आणि अन्य दोन नक्षली ठार झाले होते. त्यानंतर नक्षल्यांनी विसामुंडी येथे बिटलूचे स्मारक बांधले होते. मात्र, कालपासून सुरु झालेल्या शहीद सप्ताहादरम्यान पोलिसांनी ते स्मारक उखडून फेकले. शहीद सप्ताहादरम्यान नक्षलग्रस्त भागात चोख पोलिस बंदोबस्त असल्याने कुठेही अनुचित घटना घडली नाही. दळणवळण आणि अन्य कामेही सुरळीत सुरु असल्याचे दिसून येत आहे.

हेही वाचा 

Back to top button