दिल्लीतील जनता नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवेल : नितीन गडकरी | पुढारी

दिल्लीतील जनता नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवेल : नितीन गडकरी

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : भारताला मजबूत, सक्षम व स्वावलंबी बनविण्यासाठी दिल्लीतील जनता भाजपला पाठिंबा देऊन नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवेल, असा विश्वास केंद्रीय रस्ते व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी मंगळवारी व्यक्त केला.

पश्चिम दिल्ली मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार कमलजीत सेहरावत यांच्या प्रचारासाठी विकासपुरी भागात आयोजित सभेत गडकरी बोलत होते.

ते म्हणाले की, काँग्रेसला गेल्या ६० वर्षांत जे शक्य झाले नाही, ते नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील एनडीए सरकारने दहा वर्षांच्या काळात केले. जनतेसमोर आम्ही विकास कामांचा अहवाल घेऊन जात आहोत.

नमामी गंगा प्रकल्प, यमुना शुद्धीकरण प्रकल्प, दिल्लीला पाणी देण्यासाठी केलेल्या योजना, विविध रस्ते आणि राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प या विकास कामांची माहिती गडकरी यांनी दिली.

Back to top button