

स्वतः मधील कलागुण समाजासमोर सादर करण्यासाठी पूर्वी केवळ नाटक हे माध्यम होते. आता सोशल मीडिया हे मोठे व्यासपीठ निर्माण झाले आहे. यातून अनेकजण खटाटोप करत असतात. आपल्या सभोवताली असणार्या वातावरणाचा चांगला उपयोग करून चांगल्या थीमला नागरिक पसंत करतात. यामुळे याकडे करिअर म्हणून ही पाहिले जात आहे.– सुवर्णा चोंधे, अभिनेत्रीआजची तरुणाई छोटे-छोटे रिल्स तयार करून कमी खर्चात स्वतःमधील आवड जोपासत असतात. सोशल मीडिया हे आता मोठे व्यासपीठ झाले आहे.– संजय मराठे, शॉर्ट फिल्म निर्माताजेव्हा आम्ही व्हिडीओ शूट करतो त्यावेळी खूप अडचणी येत असतात. शूट करण्यासाठी जागा शोधणे, साहित्य, सामग्री सतत जवळ बाळगावी लागते. परिसरात शूट करीत असताना गर्दी करून बघ्याची भूमिका घेत असणार्या नागरिकांचा नाहक त्रास होत असतो. या वेळी अनेकजण आम्हाला वेडे समजतात. आम्ही जे करीत असतो त्याला टाइमपास म्हणतात.– पंकज सोहनी, कोरिओग्राफर