भाजप खासदाराने मांडली गडकरींसमोर याविषयी कैफियत; केंद्रीय मंत्र्यांकडून कारवाईचे आश्वासन | पुढारी

भाजप खासदाराने मांडली गडकरींसमोर याविषयी कैफियत; केंद्रीय मंत्र्यांकडून कारवाईचे आश्वासन

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा: महामार्गावरील भटक्या जनावरांची तसेच गतीअवरोधकांच्या समस्येला गुरूवारी (दि.२७ जुलै) भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी वाचा फोडली. केंद्रीय रस्ते आणि परिवहन मंत्रालय चांगली कामगिरी करीत आहे. पंरतु, महामार्गावर भटक्या जनावरांचा वावर मोठी समस्या असल्याची खंत दुबे यांनी केंद्रीय मंत्र्यांसमोर व्यक्त केली. दुबे यांनी त्यांच्या गोड्डा (झारखंड) लोकसभा मतदार संघात महामार्गवरील गतीअवरोधक आणि राज्य महामार्गांच्या स्थितीसंबंधीचे गाऱ्हाणे देखील गडकरी यांच्या समक्ष मांडले.

दुबे यांनी उपस्थित केलेल्या मुद्दयांवर सभागृहात उत्तर सादर करतांना गडकरी यांनी एका प्रकरणात मंत्रालयाकडून विलंब झाल्याची कबुली दिली. पंरतु,चुकी करणाऱ्यांना माफ केले जाणार नाही, असेही गडकरींनी स्पष्ट केले. दुबे यांनी उपस्थित केलेल्या मुद्दयांवर मंत्रालय विचार करेल, अशी ग्वाही देखील गडकरींनी सभागृहात दिली.

हेही वाचा:

Back to top button