Ratnagiri : मुंबई- गोवा महामार्गावर निवळी घाटात दरड कोसळली | पुढारी

Ratnagiri : मुंबई- गोवा महामार्गावर निवळी घाटात दरड कोसळली

रत्नागिरी; पुढारी वृत्तसेवा : रत्नागिरी – मुंबई – गोवा महामार्गावर निवळी घाटामध्ये दरड कोसळल्याने महामार्ग वाहतुकीसाठी बंद झाला होता. सार्वजनिक बांधकाम विभागाने जेसीबी व अन्य यंत्रणेच्या सहाय्याने रस्त्यावरील दगड, माती हटवण्यात आले. दोन तासानंतर सध्या वाहतूक सुरू झाली आहे. सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला होता.

हेही वाचा : 

Back to top button