

संगमनेर(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : मणिपूरमध्ये आदिवासी महिलांवरती झालेल्या अमानुष अत्याचाराच्या निषेधार्थ संगमनेर शहरातील महिला व तरुणींनी काळ्या साड्या आणि काळे ड्रेस परिधान करून शहरातून निषेध मोर्चा काढत या घटनेचा तीव्र शब्दामध्ये निषेध करत संताप व्यक्त केला.
जय हिंद महिला मंच आणि संगमनेर येथील विविध महिला संघटनांच्या वतीने संगमनेर बस स्थानक ते नवीन नगर रोड- मेन रोड ,चावडी मार्गे अशोक चौक छत्रपती शिवाजी महाराज चौकमार्गे बस स्थानकावर येऊन मोर्चाची या मोर्चाची सांगता झाली. या मोर्चात जयहिंद महिला मंचच्या अध्यक्षा माजी नगराध्यक्ष दुर्गा तांबे, अॅड. रंजना गवांदे,अॅड.ज्योती मालपाणी,अॅड. निशाताई शिवूरकर, डॉ. मैथिली तांबे यांच्यासह महिला व तरुणी सहभागी झाल्या होत्या.
मणिपूरची घटना ही मानवतेला काळीमा फासणारी आहे. देशात महिला असुरक्षित झाल्या असून राजकारणासाठी जाती व धर्मामध्ये तेढ निर्माण केला जात आहे. तसेच गोरगरिबांना हाकलून देत त्यांचे खोटे-नाटे व्हिडिओ बनवून मणिपूरमधील विविध समाजांची डोके भडकवली जात आहे. या मधूनच आदिवासी व गोरगरीब महिलांवर अत्याचार झाला असून तीन महिन्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने ताशेरे ओढल्यानंतर मणिपूर सरकारला जाग आली असल्याचा आरोप जय हिंदमहिला मंचाच्या अध्यक्षा आणि माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे यांनी केला.
भाजप केवळ राजकारणासाठी दोन समाजामध्ये तेढ निर्माण करून जातीय तेचे राजकारण करत आहे. आणि याचे बळी गोरगरीब महिला ठरत असल्याचा आरोप करत मणिपूरची घटनाही अत्यंत दुःखदायी आहे. मणिपूर मधील सरकार तातडीने बरखास्त करून दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी केली.महिलांवर होत असलेले अत्याचार अमानवीय आहे. महिला सुरक्षिततेचा देशभर मुद्दा झाला असून याबाबत केंद्र व राज्य सरकारने गंभीर दखलघ्यावी याबाबत राष्ट्रपती द्रोपदी मर्मू यांना महिलांच्या वतीने पोस्टकार्ड पाठविण्यात येणार आहे.
हेही वाचा