इथेनॉल, को-जनरेशन उत्पन्नातील वाटा द्यावा | पुढारी

इथेनॉल, को-जनरेशन उत्पन्नातील वाटा द्यावा

कोल्हापूर : डी. बी. चव्हाण : भुसा, मळी, प्रेसमड या उपपदार्थांच्या विक्रीतून मिळालेल्या रकमेसह साखर विक्रीतून ऊस दर काढला जातो. पण अलीकडे काही कारखान्यांनी इथेनॉल व को-जनरेशन प्रकल्प उभारले आहेत. यातून कारखान्यांना उत्पन्न मिळत आहे. याही उत्पन्नातील वाटा शेतकर्‍यांना ऊस दरातून मिळावा, अशी अपेक्षा ऊस उत्पादक शेतकरी, शेतकरी संघटना व जाणकार यांच्याकडून होत आहे.

राज्य सरकारने ऊस दर नियंत्रण मंडळाची नुकतीच घोषणा केली आहे. हे मंडळ ठरावाद्वारे आता एफआरपीच्या अहवालावर ऊस दर निश्चित करणार आहे. साखर, मळी, भुसा, प्रेसमड विक्री या बाबींचा हिशेब करून उसाचा दर ठरणार आहे. रंगराजन समितीच्या शिफारसीनुसार साखर विक्री आणि मळी, भुसा, प्रेसमड विक्रीतून जी रक्कम येते, यावरच एफआरपी जाहीर केली जाते. पण गेल्या काही वर्षांत साखर कारखान्यांनी सहवीज प्रकल्प, इथेनॉल प्रकल्प सुरू केले आहे. त्याच्यातून कारखान्यांना उत्पन्न मिळत आहे.

* भुसा उत्पादन 4 ते 10 टक्के, दर मिळतो दोन हजार रुपये टनप्रमाणे
* मळीचे उत्पादन 4 टक्के, दर मिळतो 6 ते 8 हजार रुपये टनप्रमाणे
* प्रेसमडची 250 ते 300 टनाने विक्री केली जाते
* इथेनॉल 50 ते 60 रुपये लिटरने होते विक्री
* वीज विक्री प्रतियुनिट 3 रुपये ते साडेतीन रुपये

Back to top button