सर्व काही शरद पवार यांना सांगून केले; दिलीप वळसे पाटील | पुढारी

सर्व काही शरद पवार यांना सांगून केले; दिलीप वळसे पाटील

मंचर(पुणे); पुढारी वृत्तसेवा : सर्व काही शरद पवार यांना सांगून केले आहे. मला इडी किंवा प्राप्तीकर खात्याची नोटीस आलेली नाही, असे मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी रविवारी (दि. 9) सांगितले मंचर (ता. आंबेगाव) येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने आयोजित शेतकरी मेळाव्यात दिलीप वळसे पाटील बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेस फुटल्यानंतर मंत्री झाल्यानंतर मेळावा घेऊन वळसे पाटील यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली.

सरकारमध्ये सामील झाल्यानंतर माझ्यावर विविध आरोप केले जात आहेत. परंतु, मला इडी अगर इतर कुठलीही नोटीस आलेली नाही. शिवसेना पक्षाचे आमदार फुटले तेव्हा आम्ही तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कल्पना दिली होती. मात्र, त्यांनी दुर्लक्ष केले. त्यावेळी लक्ष ठेवले असते तर आज ही परिस्थिती आली नसती. अजित पवार यांच्याबरोबर पक्षातील 45 आमदार आहेत. ते आमच्याबरोबर का आले याचा विचार पक्ष श्रेष्ठींनी करावा, असे दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले.

शरद पवारांच्या सभेस उपस्थित रहा

आपली लढाई शरद पवार यांच्याशी नाही. त्यांनी तालुक्याला भरभरून दिले आहे. याउलट त्यांची सभा आंबेगाव तालुक्यात झाल्यास राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सभेला उपस्थित रहावे, असे आवाहन दिलीप वळसे पाटील यांनी केले.

हेही वाचा

कोकण वगळता राज्यात पाऊस घटला; कोकणात 15 जुलैपर्यंत अतिवृष्टीचा अंदाज

लातूर : २ कोटी ९८ लाखांच्या दरोड्यातील आरोपीस अखेर अटक

पर्यटनाला आले, जीव गमावून बसले; गोव्यातील मैनापी धबधब्यात दोघे बुडाले

Back to top button