कोकण वगळता राज्यात पाऊस घटला; कोकणात 15 जुलैपर्यंत अतिवृष्टीचा अंदाज | पुढारी

कोकण वगळता राज्यात पाऊस घटला; कोकणात 15 जुलैपर्यंत अतिवृष्टीचा अंदाज

पुणे : कोकण वगळता उर्वरित राज्यात पाऊस कमी झाला असून, 15 जुलैपर्यंत कोकणात चांगला, तर उर्वरित भागात हलका ते मध्यम पाऊस राहील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. कोकणात 15 जुलैपर्यंत अतिवृष्टीचा अंदाज आहे. मात्र, मध्य महाराष्ट्र, विदर्भ व मराठवाड्यात हलका पाऊस होईल, असा देण्यात आला आहे. हिमालयापासून पंजाब, दिल्ली, उत्तराखंड, उत्तर प्रदेश ते गुजरातपर्यंत जोरदार पाऊस सुरू आहे. मात्र, हवेचा दाब अनुकूल नसल्याने राज्यात कोकण वगळता सर्वत्र रिमझिम पावसाचा
अंदाज आहे.

हेही वाचा

पर्यटनाला आले, जीव गमावून बसले; गोव्यातील मैनापी धबधब्यात दोघे बुडाले

चिपळूण : वाशिष्ठी नदीत पोहण्यासाठी गेलेली दोन मुले बेपत्ता; सहा जण सुखरुप

लातूर : २ कोटी ९८ लाखांच्या दरोड्यातील आरोपीस अखेर अटक

Back to top button