लातूर : २ कोटी ९८ लाखांच्या दरोड्यातील आरोपीस अखेर अटक | पुढारी

लातूर : २ कोटी ९८ लाखांच्या दरोड्यातील आरोपीस अखेर अटक

लातूर, पुढारी वृतसेवा : शहरात पडलेल्या २ कोटी ९८ लाखाच्या दरोड्यातील प्रमुख सुत्रधार असलेल्या आरोपीस अखेर अटक स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी यश आले असून तब्बल आठ महिने हा आरोपी पोलिसांना चकवा देत होता. विजय गायकवा़ड असे त्याचे नाव असून पुढील कारवाईसाठी त्याला विवेकानंद चौक पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, १२ ऑक्टोबर २०२२ रोजी मध्यरात्री कातपुर शिवारातील एका व्यवसायिकाच्या घरातील अज्ञात आरोपींनी शस्त्राचा धाक दाखवून घरातील कपाटात ठेवलेले सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकूण २ कोटी ९८ लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केला होता. या प्रकरणी विवेकानंद चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्याचा तपास करून लातूर पोलिसांनी अवघ्या दहा दिवसात गुन्ह्यातील आरोपींना लातूर, पुणे, जालना या विविध ठिकाणाहून अटक करून त्यांनी दरोड्यात चोरलेला मुद्देमाल हस्तगत केला होता. या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार विजय गायकवाड हा आठ महिन्यापासून फरार होता. स्थानिक गुन्हे शाखेचे विविध पथके त्याचा शोध घेत होते परंतु तो सतत राहण्याचे ठिकाण बदलत असल्याने मिळून येत नव्हता. त्यास अटक करण्यासाठी पोलीस अधिक्षक सोमय मुंडे यांच्या मागदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन भातलवंडे यांच्या नेतृत्वात स्थागुशा येथील पोलीस अधिकारी व अमलदारांचे विशेष पथक आरोपी विविध ठिकाणी पाठविण्यात आले होते.

दरम्यान, ९ जुलै रोजी आरोपी विजय गायकवाड हा ६० फुटी रोड येथील अबुलकलाम चौक येथे थांबलेला असल्याची गुप्तबातमीदारा मार्फत माहिती मिळाली,त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ठिकाण गाठले व विजय गायकवाड याला ताब्यात घेऊन विवेकानंद चौक पोलिसांच्या ताब्यात दिले.

हेही वाचलंत का?

Back to top button